शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळलेल्या वीज तारा ठरताहेत धोकादायक!

By admin | Updated: April 10, 2017 00:26 IST

उघडे विद्युत रोहित्र : विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार

उद्धव फंगाळ - मेहकरसध्या मेहकर शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी उघडे असलेले रोहीत्र व घरांवर लोबंकाळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.मेहकर येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाररामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिंडीग न तपासता तसेच त्या मिटर वरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत. यामुळे गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतांनाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत.अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागात सध्या भुईमुंग, कांदा, भाजीपाला, आदी पिकांसाठी पाण्याची गरज आहे. अशा पिकांना पाणी देण्यासाठी २४ तासामधून केवळ ७ ते ८ तास विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. भारनियमनाच्या नावाखाली तासन-तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच एखाद्या वेळेस शॉट-सर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.संबंधित विभागाचे अधिकारी तथा लाईनमन यांचेकडे वीज जोडण्याची मागणी अथवा तक्रार केल्यास केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळते, तर जाणीपुर्वक व खोडसाळपणाने विज जोडण्यात येत नाही. शेतकऱ्यांना नाईलास्तव खासगी लाईनमनला पैसे देउन विज जोडून घ्यावी लागते. अनेक शेतामध्ये विजेचे तार लोंबकाळलेले आहेत. तर विजेचे खांब वाकलेल्या परीस्थीत आहेत. तसेच रोहित्र उघडेच असल्याने नागरीकांच्या जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.या संदर्भात विज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कारवाई तर होतच नाही व कामही होत नाही. केवळ कागदीघोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग, सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. विज वितरण कंपनी संदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत असुन नेमका न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना पडला आहे. विज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत वितरणच्या या कामाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.