शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना

By admin | Updated: January 12, 2015 23:25 IST

नांदुरा येथील दरोडाप्रकरण; अटक आरोपींना १७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी.

नांदुरा (बुलडाणा): रविवारी झालेल्या दरोडा प्रकरणातील उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यासाठी नांदुरा पोलिसांचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर रात्री उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक श्याम दिघावकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पो.स्टे. मध्ये अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. रविवार ११ जानेवारीच्या रात्री ८.३0 वाजेच्या दरम्यान प्रेमचंद प्रकाशचंद झांबड रा.मारवाडी गल्ली नांदुरा हे त्यांच्या मालकीच्या अलंकार ज्वेलर्समध्ये नौकरासह असताना अचानक ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करुन बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी प्रेमचंद झांबड यांनी प्रतिकार केला त्यात ते जखमी झाले होते. तो आवाज ऐकून दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या त्यांच्या पत्नी मिना प्रेमचंद झांबड यांनी समय सुचकता दाखवत त्वरीत पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. यावेळी आरोपी मजहर खान गोहरखान ( २७ ) याला घटनास्थळी पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अन्य अज्ञात आरोपींपेकी ज्ञानगंगा नदी पुलाजवळ रवि विनोद बडोले (२४) याला पकडण्यात यश आले. इतर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी आरोपी कडून एक बंदुक चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. दरम्यान आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.याप्रकरणी अप नं.६/१५ भादवि ३,२५ आर्म अँक्ट कलम ५ स्पोटक पदार्थ अधिनियम १९0८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, दरोड्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.