शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 12:25 IST

Buldhana News शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सांना भर रस्त्यात घेराव घालतह बॅनर काढण्यास भाग पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कोविड-१९ विषाणूविरूध्द लढणाऱ्या ऐतिहासीक लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीपासून सर्वत्र सुरूवात झाली. चिखलीतही या लसीकरणाचा शुभारंभ स्थानिक ग्रामीण रूग्णालयात पार पडला. मात्र, या लसीकरणाच्या शुभारंभासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकारे यांचा फोटो वगळल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सांना भर रस्त्यात घेराव घालतह बॅनर काढण्यास भाग पाडले.देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. चिखली ग्रामीण रूग्णालयातही या लसीकरणाचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यानुषंगाने ग्रामीण रूग्णालयात लावण्यात आलेल्या शुभारंभाच्या बॅनरवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता. ज्या महाराष्ट्रात ही लस तयार झाली, त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा फोटो नसल्याची बाब शिवसैनिकांना कळताच शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक ग्रामीण रूग्णालयात धडक दिली. लसीकरणाच्या शुभारंभासाठी ग्रामीण रूग्णालयात उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, आर.एम.ओ. जी.आर.मकानदार, डॉ.घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.इम्रान खान आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ.खान यांना संतप्तपणे रस्त्यावर घेराव घातला. त्यानंतर या प्रकरणाचा तीव्र रोष व्यक्त करीत याप्रकरणी जाब विचारला.  पुन्हा अशी चूक झाल्यास गंभीर परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा यावेळी तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला. शिवसैनिकांव्दारे   शुभारंभाचा बॅनर देखील हटविण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवसेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रितम गैची, रवी पेटकर, बंटी गैची, दीपक सोनवाल आदी उपस्थित हाेते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लसChikhliचिखली