शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामांमुळे योजना प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:05 IST

मेहकर- तालुक्यातील अनेक गावांमध्ये महाजल व पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत; मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा अपव्ययमेहकर : तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. सदर पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विविध योजनेद्वारे लाखो रुपये खर्च करण्यात येतो; मात्र अर्धवट कामे व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करूनही संबंधित गावात दरवर्षी पाणीटंचाई समस्या निर्माण होत असते. खर्च केलेल्या लाखो रुपयांचा काहीच फायदा होत नाही.मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महाजल व पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत; मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मेहकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. सदर पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत स्तरावरून विहीर अधिग्रहण, टँकर याची सुविधा करण्यात येते. ही सुविधा केवळ ३ ते ४ महिन्यांपर्यंत मर्यादित असते. या ३ ते ४ महिन्यात विहीर अधिग्रहण व टँकर यांच्यावर लाखो रुपये खर्च होतो; मात्र या लाखो रुपयांचा कायमस्वरूपी पाणी समस्या सोडविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्या गावचा कायम स्वरूपी पाणीप्रश्न मिटवावा, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत महाजल, भारत निर्माण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या. त्यामध्ये बाऱ्हई, नांद्रा न.चायगाव, मोळा, उकळी, उसरण, साब्रा, कासारखेड, जयताळा, दादुलगव्हाण, गणपूर, रत्नापूर, जामगाव, खानापूर, मेळजानोरी आदी गावचा समावेश आहे. या विविध योजनेद्वारे त्या गावामध्ये नवीन विहिरी खोदणे, पाइपलाइन करणे, पंपघर बांधणे, मुख्य पाइपलाइन करणे, पाण्याची वितरण व्यवस्था करणे, विद्युत कनेक्शन घेणे, पाण्याची टाकी बांधणे आदी कामे करण्यात येतात. महाजल योजना, भारत निर्माण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, अंतर्गत वरील १३ गावांमध्ये जवळपास २ कोटी ६७ लाख ४ हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे; मात्र लाखो रुपये खर्च करूनही या गावामध्ये दरवर्षी पाणी समस्या निर्माण होत आहे. ज्यावेळी संबंधित गावात या योजनेद्वारे कामे करण्यात आली. सदर कामे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने निकृष्ट झाली तर काही ठिकाणी अर्धवट कामे असल्याने सदर योजना अयशस्वी झाल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही संबंधित गावात आज रोजीसुद्धा पाणीसमस्या कायमच आहे.