शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:28 PM

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे

ठळक मुद्देअखंड वाहत असलेले  पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे. वाढते तापमान व भुजलाची घटलेली पातळी पाहता गोमुख धारेचा प्रवाहही कमी झाला आहे. पापहरेश्वर येथे अस्थी विसर्जनासाठी येणारे नागरिकही आता येत नसल्याचे चित्र आहे.

किशोर मापारी

लोणार - जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया  झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिराश होत आहे. त्यातच वाढते तापमान व भुजलाची घटलेली पातळी पाहता गोमुख धारेचा प्रवाहही कमी झाला आहे. दरम्यान, पापहरेश्वर येथे अस्थी विसर्जनासाठी येणारे नागरिकही आता येत नसल्याचे चित्र आहे.

शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंती पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनद्वार असलेल्या या मंदिरात रामाची मूर्ती असून बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरल्यानंतर नऊ वर्षापूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत आहे. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते.

एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत: च पाण्याच्या प्रतिक्षेत व्याकुळलेला आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते. झऱ्यातील पाणी गोड असल्याने याच ठिकाणी पर्यटक जेवण घेऊन विश्रांती करत असत. विद्यार्थी सुद्धा या  झºयातील पाण्याचा स्वाद घेऊन तहान भागवत व सहलीचा आनंद घेत. परंतु अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच गेल्या  नऊ वर्षापासून व्याकुळलेला दिसून येत आहे.

झऱ्याचे पाणी कधी प्रवाहीत होणार?

रामगया झऱ्याच्या पाठोपाठ गेल्या चार वर्षापासून पापहरेश्वर धार ही आटलेली आहे. राज्यभरातून  अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येथे येत होते. त्यानंतर याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. ह्या धारेच्या पाण्याची ही चव गोड होती. अखंड वाहणाऱ्या पापहरेश्वर धारतीर्थ गेल्या चार वर्षापासून आटलेले आहे; पण याबाबतीत प्रशासन मात्र उदासीन भूमिका घेत असून आज पर्यंत पाण्याचे झरे पुन्हा प्रवाहीत व्हावेत या दृष्टीने कुठलेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत.

दिवसेंदिवस भूजलाची पातळी घटत चाललेली आहे. यामुळे झरे आटल्याचा अंदाज आहे.

- एच. बी. हुकरे,  वरिष्ठ संरक्षण सहाय्यक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, लोणार उपमंडळ.

 

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाWaterपाणी