शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील पळशी गावाने मिळविला होता राज्यातील पहिलाच पुरस्कार

By admin | Updated: February 17, 2015 01:27 IST

स्मृती उजाळा; आबांच्या संकल्पनेतील ग्रामस्वच्छतेला बुलडाणा जिल्ह्याची साथ.

बुलडाणा : एक संवेदनशील व विधायक वृत्तीचा नेता म्हणून उभ्या महाराष्ट्रात आर.आर.पाटील यांची ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने केले. ग्रामविकाससारख्या उपेक्षित खात्याला नवे रूप देतानाच गावोगाव स्वच्छतेचा मंत्र पसरवून लोकचळवळ निर्माण करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे त्यांचा आदराने ह्यमहाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबाह्ण असा उल्लेख केला जायचा. या चळवळीला बुलडाणा जिल्ह्याने भरभरून साथ दिली. सन २000-२00१ या वर्षात या योजनेतील राज्यातील पहिलाच पुरस्कार खामगावातील पळशी गावाने पटकावून आबांच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखीत केले होते. सोमवारी आर.आर.आबा यांचे निधन झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. ग्रामस्वच्छता अभियान या योजनेने महाराष्ट्रात नव्या लोकचळवळीचे बीजारोपण केले. गावोगाव स्वच्छतेचा जागर सुरू झाला. याचे सारे ङ्म्रेय आर.आर.आबा यांना जाते. पळशी हे गाव राज्यात चमकल्यावर दुसर्‍याच वर्षी वकाणा या गावाने राज्यात बाजी मारली. त्यानंतर सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ आजतागायत सुरूच आहे. सामाजिक क्षेत्रात मोठी क्रांती घडविणार्‍या आर.आर.आबांचा बुलडाण्याशी अनेक अर्थांनी ऋणानुबंध राहिला आहे. माजी आरोग्य मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ह्यडॉक्टरह्ण या नावांनी अनेकदा जाहीर भाषणातूनही त्यांनी ते व्यक्त केले होते.