हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व ओपन जिमचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उद्घाटन व जिल्हा युवा पुरस्कारार्थींचा सत्कार, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे.
आरोग्य तपासणीही होणार
आरोग्य विभागाच्या सहकार्याने फिटनेसबाबत खेळाडूंची आरोग्य तपासणी करणे, शरीरातील रोग, प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी (इम्युनिटी) जागरूकता निर्माण करणे, ऑनलाइन विविध खेळविषयक चर्चासत्रे, वेबिनारचे आयोजन, फिजिओथेरपिस्ट व डायटबाबत मार्गदर्शन शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहण्याकरिता ऑक्सोमीटरची तपासणी करणे, त्याबाबतची माहिती पटवून देणे, विविध तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.