ट्रक अपघातात एक ठार, तीन जखमी

By Admin | Updated: October 1, 2015 00:07 IST2015-10-01T00:07:19+5:302015-10-01T00:07:19+5:30

नांदुरा मार्गावरील सैनिकी ढाब्याजवळ अपघात.

One killed, three injured in truck accident | ट्रक अपघातात एक ठार, तीन जखमी

ट्रक अपघातात एक ठार, तीन जखमी

खामगाव : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील सैनिकी ढाब्याजवळ ३0 सप्टेंबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. खामगावकडून मलकापुरकडे जाणारा ट्रक क्र.डब्ल्यु.डी.२३-सी २८९१ ची उपरोक्त ठिकाणी समोरून येणार्‍या ट्रकशी जोरदार धडक झाली. यात ट्रकचालक अजयकुमार गुजर (वय ३0) रा.भिवानी (हरीयाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्रकुमार गुजर (वय ३0) रा.भिवानी, अनिलकुमार सिंग (वय ४२) व राजु प्रसाद (वय ३५) दोघे रा. कलकत्ता हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. नांदुरा-खामगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर खराब रस्त्यामुळे गेल्या काही काळात अपघातांची संख्या वाढली आहे.

Web Title: One killed, three injured in truck accident