शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात 'सारी'चे दीड हजार रुग्ण; ७५ टक्के सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:56 IST

Buldhana News तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानातंर्गत जिल्ह्यात १९ लाख ९७ हजार ५५५ व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले असून या मध्ये सारी अर्थात सिव्हीयर अ‍ॅक्टुट रेस्पीरेटरी इनफ्केशन (सारी) आणि इन्फ्युएनजा लाईक इन्फेक्शनचे (आयएलएम) तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान कोरोना सदृश्य लक्षणे किंवा दुर्धर आजार असलेल्या १,३५६ संदिग्धांना आतापर्यंत फिव्हर क्लिनीकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जिल्ह्यात १५ सप्टेंबर पासून या अभियानास प्रारंभ झाला असून तीन आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. या दरम्यान २,९४५ व्यक्ती या संदिग्ध रुग्ण म्हणून समोर आल्या आहेत. पैकी आशा वर्क र्सनी १,३५६ संदिग्ध रुग्णांना प्रथमत: फिव्हर क्लिनीकमध्ये उपचारासाठी पाठवीले व तेथून कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्यांना पुढील उपचाासाठी डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने ज्यांच्या शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण कमी, ताप आणि दुर्धर आजार यापैकी दोन लक्षणे आढळून आलेल्यांना पुढील उपचाराठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १८ दिवसात जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार ८९७ नागरिकांपैकी प्रत्यक्ष १९ लाख ९७ हजार ५५५ व्यक्तींना गठीत करण्यात आलेल्या १,७१८ पथकांनी भेटी देवून त्यांची आरोग्य विषयक माहिती संकलीत करत त्यांना आरोग्य शिक्षण दिले. त्यामुळे तुर्तास तरी ही मोहिम जिल्ह्यात योग्य दिशेने जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे.अद्यापही सहा लाख ६३ हजार ३४२ नागरिकांचे सर्वेक्षण होणे अद्यापही बाकी आहे. जवळपास जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी २४.९१ टक्के लोकसंख्येची आरोग्य तपासणी राहली आहे. दरम्यान, चार आॅक्टोबर रोजीही काही जणांची तपासणी झाली आहे. बुलडाणा शहरात या मोहिमेअंतर्गत वेग वाढविण्याची गरज आहे. बुलडाणा शहरात संथ गतीने हे सर्वेक्षण सुरू आहे. सोबतच मोहिमेची अ‍ॅपमध्ये माहिती भरण्याचा वेगही मंद आहे.चार लाख घरांमध्ये आरोग्य शिक्षणया मोहिमेतंर्गत १,७१८ पथकातील सदस्यांनी ४ लाख ७३ हजार १९२ घरांना भेट दिली असून कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य विषयक माहिती व प्रशिक्षणही दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७५ टक्के नागरिकांना कोरोना संदर्भाने बचाव कसा करावा, याची सविस्तर माहिती देण्यात यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले आहे. दरम्यान सरासरी ५० घरांना ही पथके दररोज भेटी देत असून माहिती संकलीत करती आहेत. या मोहिमेची पहिल्या टप्प्याची समाप्ती ही दहा आॅक्टोबर रोजी होत आहे. मोहिमेचा दुसरा टप्पा १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य