नांदु-यात आयकर विभागाकडून झाडाझडती!

By Admin | Updated: March 21, 2017 01:36 IST2017-03-21T01:36:44+5:302017-03-21T01:36:44+5:30

अकोला येथील आयकर अधिकार्‍याची कार्यवाही.

Numus-in-Income Tax Department Flora! | नांदु-यात आयकर विभागाकडून झाडाझडती!

नांदु-यात आयकर विभागाकडून झाडाझडती!

नांदुरा, दि. २0- नांदुर्‍यातील कापड व्यावसायिक लखन टेक्सटाइल्स व मोहीत कलेक्शन येथे सोमवारी खामगाव व अकोला येथील आयकर अधिकार्‍यांनी तब्बल तीन तास झाडाझडती घेतली. मार्च एण्डींगच्या काळात आयकर विभागाच्यावतीने शहरातील या कारवाईमुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शहरातील सिनेमा रोडवर रामचंदानी यांचे लखन टेक्सटाइल व मोहीत कलेक्शन या नावाने घाऊक व किरकोळ कापडाचा व्यवसाय असून, सोमवारी अचानक या ठिकाणी आयकर विभागाने धाड टाकली. यावेळी दुकानातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जायची व बाहेरील व्यक्तीस आत येण्यास मनाई होती. कारवाई दरम्यान आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी स्टॉक बुक, सेल, परचेस रेकॉर्ड, बिले, खातेवही, दैनंदिन कॅशबुकची कसून तपासणी केली.
आयकर विभागाच्या या कारवाईत आयकर अधिकारी रूपा धांडे, आयकर अधिकारी एच.के.निम यांच्यासह आयकर निरीक्षक संजय वानखडे, तुषार ठाकरे, सुनीलकुमार, सी.जी. तिरपुडे यांच्यासह हिरालाल पाटील, एस.डी. वाघ, साजीद हुसेन या कर्मचार्‍यांचा समावेश होता.
८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ५00 व १ हजाराच्या नोटा बदी करण्यास बँकांनी जी मुदत दिली होती, त्यावेळी व्यावसायिक विक्री जास्त दाखवून रोख आवक जास्त दाखविली व आधीची जमा करून ठेवलेली ५00 व १ हजारची रोकड बँकेत भरली व काळा पैसा पांढरा केला. यामुळे सदर कारवाई झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
तीन तासांच्या चौकशीनंतर सदर व्यावसायिकांची नियमित तपासणी असल्याचे आयकर अधिकार्‍यांच्यावतीने सांगण्यात आले. मार्च एण्डींगमध्ये आयकर विभागाच्यावतीने झालेल्या शहरातील या कारवाईमुळे व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे.

Web Title: Numus-in-Income Tax Department Flora!