शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: September 30, 2015 00:31 IST

सीईओंच्या आदेशाची अवहेलनाप्रकरणी जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): : जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दोन लिपिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे आसलगाव केंद्रप्रमुखांना सादर करावयाचे आदेश त्यांना अधिकृतपणे न देता अनधिकृतरीत्या पाच दिवस कार्यालयाबाहेर ठेवले. या प्रकरणात लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, वरिष्ठ लिपिकाचाही यात सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य दि. रा. भालतडक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदनही दिले. निवेदनात नमूद केले आहे की, शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक विजय गारमोडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात निलंबित झालेले केंद्रप्रमुख तथा प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी दि. रा. देशमुख यांना पुनस्र्थापना देताना शासननिर्णय डवलून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आसलगाव केंद्रावर पुन्हा पदस्थापना दिली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व मृत मुख्याध्यापकाच्या पत्नीने दि.रा. देशमुख यांची पदस्थापना जळगाव पंचायत समितीव्यतिरिक्त अन्य पंचायत समितीमध्ये देण्यात यावी, अशी मागणी केली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य दि.रा. भालतडक यांनी लोकायुक्ताकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर बुलडाणाचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दि.रा. देशमुख यांची पदस्थापना सोनाळा (ता. संग्रामपूर) येथे २९ ऑगस्ट २0१५ च्या आदेशान्वये केली. या जागी रुजू होण्यासाठी देशमुख यांना २१ ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करणारा आदेशही निर्गमित झाला; परंतु शिक्षण विभागातील लिपिक सचिन घिवे व वरिष्ठ सहायक श्रीकांत जोशी यांनी हे दोन्ही आदेश संबंधितांकडे अधिकृतरीत्या पोहोचू दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भालतडक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोमवारी केली.