शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील अशासकीय समित्या रखडल्या!

By admin | Updated: April 11, 2017 00:12 IST

शिवसेना-भाजपाची ओढाताण; दोन वर्षांपासून कार्यकर्ते वा-यावर.

मेहकर : महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अशासकीय समित्यावरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. शिवसेना-भाजपच्या ओढाताणीमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते वार्‍यावर फिरताना दिसत आहेत.महसूल विभागातील विविध कार्यालयातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर पाच वर्षांनंतर सत्ताधारी पक्षाकडून अशासकीय समित्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. या समित्यांवर सत्ताधारी पक्षातील निष्ठावान व होतकरु कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. गेल्या दोन वर्षांंपूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तारुढ झाले आहे. परंतु बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही समित्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. अशासकीय समित्यांमध्ये दक्षता समिती, संजय गांधी निराधार योजना समिती व रोजगार हमी योजना समिती या तीन समित्यांचा समावेश आहे. ह्या तीनही समित्या गेल्या दोन वर्षांपासून बरखास्त झालेल्या आहेत. मात्र नव्याने या समित्यांच्या नियुक्त्या झालेल्याच नाहीत. त्यामुळे समितीचे कामकाज शासकीय अधिकारी, कर्मचारीच पाहतात. बुलडाणा जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता खासदार हे शिवसेनेचे आहेत, तर सात आमदारांपैकी शिवसेनेचे दोन, भाजपाचे तीन व काँग्रेसचे दोन, असे पक्षीय बलाबल आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार असेल, त्या ठिकाणी त्या पक्षाचे ६0 टक्के व इतर सत्तेतील पक्षाचे ४0 टक्के असे अंतर्गत समीकरण ठरल्याचे समजते. सध्या जिल्ह्यामध्ये भाजप-शिवसेनेमध्ये पक्ष वाढीसाठी व विविध ठिकाणी आपलीच सत्ता येऊन आपल्याच पक्षाचे वर्चस्व असले पाहिजे. यासाठी शिवसेना व भाजप पक्षामध्ये अंतर्गत चढाओढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष सत्तेमध्ये असले, तर ठिकठिकाणी अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. पक्षाच्या या चढाओढीत व ताणाताणीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अशासकीय समित्या संदर्भात वार्‍यावर हिंडताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षभेद बाजूला ठेवून अशासकीय समित्यांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी होत आहे.