ट्रॅक्टरच्या धडकेत नऊ वर्षीय मुलगा ठार

By Admin | Updated: June 1, 2017 00:12 IST2017-06-01T00:12:44+5:302017-06-01T00:12:44+5:30

अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील चांधई येथे नऊ वर्षीय मुलास ट्रॅक्टरने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.

Nine year old boy killed in a tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत नऊ वर्षीय मुलगा ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत नऊ वर्षीय मुलगा ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील चांधई येथे नऊ वर्षीय मुलास ट्रॅक्टरने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की अमडापूर पो.स्टे.ला भारत भीमराव तवर (वय ४३) रा. चांधई यांनी तक्रार दिली, की त्यांचा भाचा आशिष श्रीधर मोरे रा. दिवठाणा हा ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता गावाजवळ रोडने येत असता आरोपी फकिरा रामचंद्र वाघमारे रा. चांधई याने ट्रॅक्टर वेगाने व निष्काळजीपणे चालवून आशिष मोरेला धडक दिली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला असल्याची तक्रार भारत भीमराव तवर यांनी दिली. तक्रारीवरून आरोपी चालक फकिरा रामचंद्र वाघमारे याच्याविरुद्ध अप नं. १३६/१७ कलम २७९, ३३७, ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश गवई हे करीत आहेत.

Web Title: Nine year old boy killed in a tractor crash