शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीचे रोपटे देऊन नववर्षाचे स्वागत

By admin | Updated: January 1, 2015 00:40 IST

तुळशीचे रोपटे औषधीय गुणांनी संपृक्त.

लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील अजिसपूर येथील निसर्गमित्र अनिल धंदरे या युवकाने शहरातील ३0 व्यावसायिकांना तुळशीचे रोपटे देऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम वाढत असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, अवेळी पाऊस, गारपीट यासारखे नैसर्गिक संकट २0१४ मध्ये उभे राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला. यामुळे गतवर्षी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती येणार्‍या २0१५ नवीन वर्षात घडू नये यासाठी तालुक्यातील अजिसपूर येथील निसर्गमित्र अनिल धंदरे या तरुणाने शहरातील ३0 व्यावसायिकांना तुळशीचे रोपटे देऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. मानवी जीवनात तुळशीचे मोठे महत्त्व असून, दैनंदिन जीवनात तुळस ही पूजनीय वनस्पती असून, तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानले जाते; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्वी घराच्या अंगणात दिसणारे तुळशीचे रोपटे आता दिसेनासे झाले आहे. यामुळेच अजिसपूर येथील अनिल धंदरे या तरुणाने शहरातील ३0 व्यावसायिकांना नववर्षानिमित्त तुळशीचे रोप भेट देऊन तुळस दुकानासमोर लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहनही केले.