शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मानसिकता बदलण्याची गरज

By admin | Updated: October 17, 2014 23:48 IST

‘लोकमत परिचर्चे’तील सूर : हरित सेना जनजागृती करणार.

बुलडाणा : दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची रेलचेल, सकाळ-संध्याकाळी नवे नवे गोड पदार्थ, रात्री लख्ख प्रकाशाची आरास व सोबत कानठळ्या बसणार्‍या फटक्यांचा आवाज, असे एकूण चित्र सर्वत्र दिसून येते. मात्र अशा प्रकाराचा आनंद घेताना तो क्षण अनेकांना दुख देवून जातो. अतितिव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायम स्वरूपी बहिरेपण देवून जातात. तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व देवून जातात. त्यामुळे दिवाळी ध्वनी प्रदुषण मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची गरज असत्याचा सूर लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेतून निघाला. यावेळी हरीत सेनेने समाजात विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.उत्सव कोणताही आला की चर्चा सुरू होते ती प्रदूषणाचीच. गणेशोत्सव आला, की नदीच्या प्रदूषणाची आणि दिवाळी आली की हवेच्या प्रदूषणाची. भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिकजवळ जाणारी संस्कृती आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पुजा, मात्न असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही.दिवाळी साजरी करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठया संकटास आपण आमंत्नण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठया प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता असते. सर्व प्राणीमात्नांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. तसेच यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असा सूर परिचर्चेत निघाला.