नाफेडच्या केंद्रांवर तुरीची थप्पी कायम

By Admin | Updated: May 2, 2017 18:58 IST2017-05-02T18:58:48+5:302017-05-02T18:58:48+5:30

खामगाव- आठ दिवसांचे वर कालावधी उलटत असताना देखील अद्यापही नाफेडच्या केंद्रांवर तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही. यामुळे तूर विकण्यासाठी बसून असलेले शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

The Naphade centers have a tug of fire | नाफेडच्या केंद्रांवर तुरीची थप्पी कायम

नाफेडच्या केंद्रांवर तुरीची थप्पी कायम

खामगाव : नाफेडच्या केंद्रांवर मुदतीत आलेल्या हजारो क्ंिवटल तुरीचे मोजमाप थांबले आहे. केंद्रांवर मुदतीत आलेल्या हजारो क्ंिवटल तुरीचे मोजमाप थांबले आहे. दरम्यान शासनाने तूर खरेदीबाबत आश्वासन देत यासाठी निधीची तरतूद केल्याचे सुध्दा जाहीर करण्यात आले. मात्र याला आठ दिवसांचे वर कालावधी उलटत असताना देखील अद्यापही नाफेडच्या केंद्रांवर तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही. महिनाभर तुरीच्या केंद्रांवर तूर विकण्यासाठी बसून असलेले शेतकऱ्यांमध्ये यामुळे संताप व्यक्त होत आहे. शशासनाने आदेश दिल्यानंतरही केंद्र सुरु न झाल्याने तसेच संबंधित यंत्रणेकडून योग्य उत्तरही मिळत नसल्याने केंद्रांवर तूर ठेवावी की घरी घेवून जावी, असा संभ्रम निर्माण झाला आहे. एकूणच बाजारात तुरीचे भाव पडलेले असताना शासनाच्या हमीदराचा शेतकऱ्यांना आधार होता मात्र महिनाभर या केंद्रांवर मुक्काम तूर आणण्यासाठी झालेला खर्च हे पाहता शेतकऱ्यांच्या हाती तुरीचा हमीदर कमीच मिळत आहे. यामुळे शेतकरी शेतकरी व्यापाऱ्यांना तुरीची विक्री करीत असून पर्यायाने व्यापारीच शासनाच्या हमीदराचा लाभ घेत आहेत. त्यामुळे शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ मिळत नसून ह्यभीक नको पण कुत्रा आवरह्ण अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: The Naphade centers have a tug of fire