शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम फेरीत नागपूरचा दबदबा

By admin | Updated: October 12, 2014 23:15 IST

अकोला येथे सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेचा समारोप.

अकोला : येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत नागपूरच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण केला. १४ वर्ष व १६ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद नागपूर येथील खेळाडूंनी प्राप्त केले. वैयक्तिक खेळाडूंचा पुरस्कारदेखील नागपूरच्या खेळाडूंनी मिळविला. १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद नागपूरच्या मॉर्डन स्कूलने पटकाविले. उपविजेतेपद कोल्हापूरच्या छत्रपती शाहू विद्यालयाने तर तृतीय पुरस्कार नारायणा विद्यालयम नागपूरला मिळाला. १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाचे विजेतेपद जिंदाल विद्या मंदिर वाशिंद, ठाणे या संघाने मिळविले. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूर यांनी तर तृतीय पुरस्कार कोल्हापूर पब्लिक स्कूलने प्राप्त केला. १६ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे विजेतेपद सेंट्रल पॉईंट स्कूल नागपूरने प्राप्त केले. उपविजेतेपद भवन्स विद्या मंदिर नागपूरने तर तृतीय पुरस्कार अंबुजा विद्या निकेतन चंद्रपूरने पटकाविला. १६ वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेचे विजेतेपद इंदिरा नॅशनल स्कूल पुणेने पटकाविला. उपविजेतेपद नवरचना स्कूल वडोदरा तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी प्राप्त केला. १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कूल सुरतने विजेतेपद पटकाविले. उपविजेतेपद देव पब्लिक स्कूल एैरोली नवी मुंबई तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी मिळविला. १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत जिंदाल विद्या मंदिर वाशिंद, ठाणे यांनी विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद भवन्स विद्या मंदिर नागपूर यांनी तर तृतीय पुरस्कार दिल्ली पब्लिक स्कूल सुरत यांनी मिळविला. १४ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत कादंबरी भांडारकर या नागपूर येथील मॉर्डन स्कूलच्या विद्यार्थिनीने विजेतेपद प्राप्त केले. उपविजेतेपद सुरत येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या जान्हवी भुपतानी हिने तर तृतीय पुरस्कार नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या साक्षी अफजलपूरकर हिने मिळविला. याच वयोगटात मुलांच्या एकल स्पर्धेत ठाणे-वाशिंद येथील जिंदाल विद्या मंदिरच्या जितेंद्र यादवने विजेतेपद, कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या वेदांत कुळकर्णी याने उपविजेतेपद तर भवन्स विद्या मंदिर नागपूरच्या साकेत गांधी याने तृतीय पुरस्कार मिळविला. १६ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत नागपूरच्या सेंटर पॉईंट स्कूलच्या रिक्वक्षा वली विजेती ठरली. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूरच्या आरू वैष्णव हिने, तर तृतीय पुरस्कार दिल्ली पब्लिक स्कूल सुरतच्या संजना चोकसी हिने मिळविले. याच गटातील मुलांच्या एकल स्पर्धेत इंदिरा नॅशनल स्कूल पुणेच्या रोशन खिनवासरा याने विजेतेपद, तर कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या कौशिक जोशी याने उपविजेतेपद पटकविले. तृतीय पुरस्कार नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या श्रीहर कानिकर याला मिळाला. १९ वर्ष वयोगटात मुलांच्या एकल स्पर्धेत सुरतच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या भाऊमिल रासकापूरवाला याने विजेतेपद, तर १६ वर्ष वयोगटात मुलींच्या एकल स्पर्धेत नागपूरच्या सेंटर पॉईंट स्कूलच्या रिक्वक्षा वली विजेती ठरली. उपविजेतेपद भवन्स विद्यामंदिर नागपूरच्या विलोक टावरी याने प्राप्त केले. तृतीय पुरस्कार जिंदाल विद्या मंदिर वाशिंद ठाणेच्या कान्हू जेना याने मिळविला.