शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:18 PM

यासंदर्भात ७ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशीत करून चारा टंचाईचा प्रश्न उजेडात आणला असता, प्रशासनाकडून चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

बुलडाणा: जिल्ह्यात चाराटंचाई असताना तालुकास्तरावरून चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला नाही. त्यामुळे गुरांवर उपासमारीची वेळ आली असून पशुपालकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात ७ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशीत करून चारा टंचाईचा प्रश्न उजेडात आणला असता, प्रशासनाकडून चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चारा छावणी सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थानी सामाजिक दृष्टीकोनातून पुढाकार घेत २० मे पर्यंत संबंधित तालुका स्तरीय समिती सदस्य, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार), गटविकास अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय समिती यांचे अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेत सादर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भीषण चारा टंचाई जाणवत असेल, अशा गावात किंवा महसूल मंडळनिहाय चारा छावणी सुरू करता येते.  शासन निर्णयान्वये संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, उद्देश पत्रिका, मागील तीन वर्षाचे आॅडीट रिपोर्ट, संस्थेच्या नावाचे पासबुक व त्याची झेरॉक्स, विद्युत पुरवठा उपलब्धेतचा वीज देयकाचा पुरावा, शेतात विहीर/बोअरवेल असल्याच्या सातबारााी नोंद, तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला, संस्थेकडे हिरवा किंवा कोरडा चारा उपलब्ध आहे किंवा कसे याबाबतचा संस्थेचा दाखला, संस्थेकडे चारा उपलब्ध नसल्यास चारा कसा, कोठून उपलब्ध करणार याचे नियोजन, चारा बाहेरून आणावयाचा असल्यास संस्था वाहतूक करण्यास सक्षम आहे काय, याबाबतचा पुरावा प्रस्तावासोबत असावा. पशुधनासाठी नियमित योजनेमधून उपलब्ध असलेला चारा तसेच अतिरिक्त चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम व गाळपेर योजनेमधून उपलब्ध होणाºया चाºयाबाबत पशुसंवर्धन विभागाचा दाखला  असावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. चारा छावणीसाठी किमान २५० व कमाल ३ हजार जनावरे अनुज्ञेय असणार आहेत. प्रत्येक जनावराचे मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण मोठ्या व लहान जनावरांपैकी केवळ पाच जनावरे (लहान व मोठे) जनावरांच्या छावणीत दाखल करता येतील. छावणीत दाखल करावयाची जनावरे ही जनावराच्या मालकाच्या इच्छेनुसार, लेखी संमतीने व स्थानिक तलाठी यांचा दाखला प्राप्त झाल्यावरच दाखल करून घेता येतात, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मोठ्या जनावरास ९० व लहान जनावरास ४५ रुपये अनुदानछावणीतील प्रति मोठे जनावरास प्रतिदिन ९० रुपये व लहान जनावरास प्रतिदिन ४५ रुपये अनुदान मिळेल. छावणी चालकाचे १०० रूपयांचे स्टॅम्प पेपरवर सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. यापूर्वीच्या कालावधीमध्ये ज्या चारा छावणीत प्रायोजक संस्थावर चारा छावणीमधील अनियमितते संदर्भात फौजदारी गुन्हे दाखल केलेले नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.असे द्यावे लागणार खाद्यनिवारा शेड यासाठी आवश्यक असून रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. जनावरांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मोठ्या जनावराकरीता १८ किलो व लहान जनावरासाठी ९ किलो हिरवा चारा आणि आठवड्यातून तीन दिवस एक दिवस आडप्रमाणे मोठे जनावरास एक किलो व लहान जनावरास अर्धा किलो पशुखाद्य द्यावे लागेल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा