मंगरूळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:32 IST2019-11-01T15:31:55+5:302019-11-01T15:32:02+5:30

वैशाली जितेंद्र बोर्डे (३१), ओंकार जितेंद्र बोर्डे (८)आणि छकुली उर्फ प्रतीभा बोर्डे (६) अशी मृतांची नावे आहेत.

Mother's suicide with two children in Buldhana district | मंगरूळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या!

मंगरूळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या!


लोकमत न्यूज नेटवर्क
शेळगाव आटोळ/अंढेरा: येथून जवळच असलेल्या मंगरूळ (ईसरूळ) येथील एका विवाहीतेने आठ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वैशाली जितेंद्र बोर्डे (३१), ओंकार जितेंद्र बोर्डे (८)आणि छकुली उर्फ प्रतीभा बोर्डे (६) अशी मृतांची नावे आहेत. मंगरूळ येथील वैशाली जितेंद्र बोर्डे या ३० आॅक्टोबर रोजी आपल्या दोन्ही अपत्यांसह घरातून निघून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने त्यांचे पती जितेंद्र बोर्डे यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. सोबतच याबाबत मंगरूळ येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यांनाही याबाबत माहिती दिली होती. नातेवाईकांकडे संपर्क करूनही त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, ३१ आॅक्टोबर रोजी बोर्डे यांच्याच शेतातील विहीरीजवळ सकाळी चपला आढळून आल्याने वैशाली बोर्डे यांनी आत्महत्यातर केली नसावी ना, असा ग्रामस्थांचा संशय बळावला. ग्रामस्थांनी विहीरीत शोध घेतला असता वैशाली, ओंकार आणि छकुलीचे मृतदेह विहीरीत आढळून आले. या प्रकरणी पोलिस पाटील ज्योती गवते यांनी अंढेरा पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मतदकार्य करत तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. चिखली ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. आपल्या चिमुकल्या दोन अपत्यांसह विवाहीतेने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Mother's suicide with two children in Buldhana district