आठ महिन्यांच्या मुलासह मातेची आत्महत्या

By Admin | Updated: October 16, 2015 01:55 IST2015-10-16T01:55:56+5:302015-10-16T01:55:56+5:30

सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल.

Mother's suicide with an eight month old child | आठ महिन्यांच्या मुलासह मातेची आत्महत्या

आठ महिन्यांच्या मुलासह मातेची आत्महत्या

सिंदखेडराजा : आठ महिन्यांच्या मुलासह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी रात्रीदरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी १५ ऑक्टोबरला सासरकडील मंडळीविरुद्ध विविध कलमान्वये स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळगाव बु. येथील मनिषा शिवहरी काकड (२१) ही महिला तिच्या आठ महिन्यांच्या सार्थक या मुलासह दोन दिवसांपासून बेपत्ता होती. यासंदर्भात शिवहरी कडूबा काकड यांनी १४ ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक एम.एम. जाधव व त्यांच्या कर्मचार्‍यांनी तसेच महिलेच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला असता १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता सार्थक काकडचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. विहिरीचे पाणी उपसल्यानंतर मनिषाचे प्रेतही त्याच विहिरीत आढळून आले. यासंदर्भात मृतक महिलेचे वडील विलास बाबूराव चौधरी रा.पिंप्री खंदारे यांनी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शिवहरी कडूबा काकड, कडूबा सखाराम काकड, रखमा कडूबा काकड, संगीता गणेश मुंढे, विठोबा हरी मुंढे यांच्याविरुद्ध कलम ३0४ ब, ३0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Mother's suicide with an eight month old child