शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

जननी’ला हवी सुरक्षा

By admin | Updated: July 10, 2015 00:06 IST

जननी सुरक्षा दिन विशेष; बुलडाणा जिल्ह्यातील ४३८ महिलांच्या प्रसूति घरीच.

बुलडाणा : जननी सुरक्षा योजना केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २00५-0६ या वर्षी सुरू केली. त्यानुसार प्रथम ग्रामीण आणि नंतर नगरपालिकांच्या नागरी क्षेत्रात अंमलबजावणीस मंजुरी मिळाली. गरोदर माता व होणार्‍या बाळाला सुदृढ आरोग्य व सुरक्षा लाभावी, असा योजनेचा उद्देश आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील जननीला आता सुरक्षा हवी आहे. कारण गेल्या सहा महिन्यांत ४३८ महिलांची प्रसूती घरीच झाली असून, आदिवासीबहुल गावांमध्ये हा आकडा ८३ चा आहे. जननी सुरक्षा, जननी-शिशू सुरक्षा, नवसंजीवनी अशा अनेक योजनांवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. या योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरापासून तर गावपातळीपर्यंत मोठी यंत्रणासुद्धा काम करते. प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणा केवळ उपचार म्हणून चालविली जात आहे. आजही आदिवासीबहुल गावांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृती नाही. संग्रामपूर आणि जळगाव जामोद या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये घरीच प्रसूती आणि माता-बालक मृत्यूचे प्रमाण मोठे आहे आहेत. दारिद्रय़रेषेखालील मातांना जननी सुरक्षा योजनेत लाभ देण्यात येतो, तर शहरी भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ मिळतो. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत जानेवारी ते जून २0१५ अखेरपर्यत २१ हजार ४८0 गरोदर महिलांची नोंद करण्यात आली. यात जननी व शिशू संपोपनाच्या उद्देशाने जननी सुरक्षा योजनेसाठी १६ हजार ७४२ मातांची निवड करण्यात आली. तथापि, ७३६६ लाभार्थी उद्दिष्ट असताना ४0९९ महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे.

*४३८ महिलांची प्रसूति घरीच

   गेल्या ६ महिन्यात प्रसुतीची माहिती घेतली असता ४३८ महिलांच्या प्रसूति या घरी झाल्या असल्याचे आढळून आले. यात जानेवारी महिन्यात ८७, फेब्रुवारी महिन्यात ७१, मार्चमध्ये ६२, एप्रिलमध्ये ६८, मे महिन्यात ७१ आणि जून महिन्यात ७९ महिलांची प्रसूति घरी झाल्याची नोंद आहे.

*१0 महिला, १६ बालकांचा मृत्यू

  घरीच प्रसूति होण्याच्या प्रकारात एप्रिल २0१४ ते मार्च २0१५ काळात १0 महिला आणि १६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातून आरोग्य प्रशासनाला ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधांकडे पोहोचविण्यात अपयश आल्याचे लक्षात येते.

*आशामध्ये निराशा

जननी सुरक्षासाठी राबणार्‍या आशा स्वयंसेविका हा मुख्य घटक ग्रामीण भागात काम करते; मात्र जननी सुरक्षा योजनेतून या सेविकांना प्रति लाभार्थी प्रोत्साहन भत्ता दिला जातो; मात्र २0१४-१५चा भत्ता अद्यापही शासनाकडून आशांना मिळाना नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.