सावकारीचा वाद, उधारीच्या पैशातून युवकाची हत्या; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:14 IST2025-06-23T16:13:22+5:302025-06-23T16:14:11+5:30

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर सावकारीच्या वादातून भरत विरशीद याची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

Moneylender dispute, youth murdered over borrowed money; Accused arrested | सावकारीचा वाद, उधारीच्या पैशातून युवकाची हत्या; आरोपी अटकेत

सावकारीचा वाद, उधारीच्या पैशातून युवकाची हत्या; आरोपी अटकेत

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर सावकारीच्या वादातून भरत विरशीद (वय ४०, रा. नांद्राकोळी, ता. बुलढाणा) याची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना २३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (वय २५) याने मृत भरत विरशीद याला १० लाख रुपये सावकारीवर दिले होते. मात्र, या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादातूनच ज्ञानेश्वर निकाळजे याने भरतच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात भरत गंभीर जखमी झाला असून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत पोफळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीस ताब्यात घेतले. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून, ही हत्या सावकारीच्या पैशातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Moneylender dispute, youth murdered over borrowed money; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.