शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकुळ

By admin | Updated: July 2, 2014 23:57 IST

देऊळगावराजा शहरात दर शनिवारी भरणार्‍या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची मोठी टोळीच कार्यरत.

देऊळगावराजा : देऊळगावराजा शहरात दर शनिवारी भरणार्‍या आठवडी बाजारावर मोबाईल चोरट्यांनी करडी नजर ठेवल्याने नागरिकांना जवळ मोबाईल बाळगावा की नाही, असा प्रश्न पडला आहे. शनिवारी आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल हमखास चोरी जात असल्याने बाजारात मोबाईल चोरट्यांची मोठी टोळीच कार्यरत आहे.
आठवडी बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरी जातात याची कल्पना यापुर्वी घडलेल्या घटनांमुळे देऊळगावराजा पोलिसांना असतानादेखील त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मोबाईल चोरांना मोकळे रान मिळत आहे. देऊळगावराजा शहरात उदरु प्रथामिक शाळेचे मैदानात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासुन सांयकाळपर्यंत शहरातील नागरिक बाजारात विविध वस्तु तसेच भाजीपाला खरेदीसाठी येत असतात बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन आठवडी बाजारात फिरणार्‍या मोबाईल चोरांची येणार्‍या नागरिकांवर करडी नजर असते. भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक खाली बसल्यानंतर तसेच गर्दीत धक्का देऊन ते शर्टच्या तसेच पँटच्या खिशातील मोबाईल हातोहात लंपास करतात व पसार होतात.
मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतात मात्र त्यांना तेथे पोलीसांकडुन व्यवस्थित सहकार्य मिळत नसल्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गेल्या पावली माघारी फिरावे लागते वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे भाजीबाजार की मोबाईल चोरांचा बाजार असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.