पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:12 PM2019-12-09T14:12:59+5:302019-12-09T14:16:47+5:30

आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे.

Mastermind of Pune robbery is Son-in-law of Buldhana | पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

googlenewsNext
ठळक मुद्देआयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी. दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केल आहे. बुलडाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाचा दीपक जाधव जावाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पुण्यातील चंदननगरमधील आयआयएफएल गोल्ड लोन वरील दरोड्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बुलडाण्यातून एका अधिकाऱ्याचा जावाई असलेल्या दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केल आहे. दरम्यान या दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार तोच असल्याचे चंदननगर पोलिस ठाण्याती अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे.
पुणे पोलिसांनी बुलडाणा शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सात डिसेंबर रोजी दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. दरम्यान, बुलडाणा येथून पथकाने एमएच २८-एएन- ५०५० क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरात आआयएफएल ही गोल्ड लोन कंपनी अर्थात इंडिया इन्फोलीन फायनान्स लिमिटेडमध्ये (आयआयएफएल) पाच डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल १२ किलो वजनाचे चार कोटी २० लाख रुपयांचे तारण ठेवलेले सोने बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले होते. जवळपास ३९४ पॅकेटमध्ये ते ठेवण्यात आलेले होते. पाच डिसेंबर रोजी बंदुकीच्या धाकावर या आआयएफएलमध्ये दरोडा टाकून हे सोने लुटण्यात आले होते.
दरम्यान, त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, स्थानिक पातळीवर मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार याची खबºयाकडून माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी बारकाईने विश्लेषण करत चंदननगर पोलिसांनी सात डिसेंबर रोजी बुलडाणा गाठले होते. बुलडाणा शहरातील आरास ले आऊटमधील एका व्यक्तीच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जात या पथकाने तेथून दीपक विलास जाधव (३२, रा. फ्लॅट नं. ६०९, ज्युबल्ेन बिल्डींग, वाघोली, पुणे) यास अटक केली. बुलडाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाचा दीपक जाधव जावाई आहे. दरम्यान, त्याचा एक नातेवाईकही संशयावरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याची सध्या चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी उशिरापर्यंत चंदनगर पोलिसांनी येथे कारवाई करत दीपक जाधवकडून शौचालयात ठेवलेले आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पुणे येथील या पथकाने प्रकरणातील दुसºया आरोपीसही चंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनच अटक केली असून सनी केवल कुमार (२९,रा. ८१२, सतरंजी चौक, लोणार गल्ली, पणे) यास अटक केली असल्याची माहिती एपीआय गजानन जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणात पोलिसांनी अताापर्यंत तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १२ किलो सोन्यापैकी आठ किलो ६०० ग्रॅम सोने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार एमएच-२८-एएन-५०५० ही ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच आम्ही हस्तगत करू असे एपीआय गजानन जाधव यांनी बोलताना सांगितले. चंदनगर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव, अजित धुमाळ, तुषार खराडे, तुषारा अल्हाट, चेतन गायकवाड, कृष्णा बुधवत, सुभाष आव्हाड यांनी बुलडाण्यात कारवाई केली. त्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी आणि बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाºयांनी या पथकास मदत केली.


चार पैकी एक आरोपी राजस्थानातील
आयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून मनिष यादव नामक आरोपी हा राजस्थानमधील रहिवाशी असून त्याचा एक श्याम नामक साथीदारही आहे. दीपक विलास जाधवने चौकशीत या दोघांची नावे सांगितली असून पुणे पोलिस सध्या त्यांच्या मागावर आहे. दरम्यान प्रकरणातील चौथा आरोपी सनी केवल कुमार हाही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.
वाशिमच्याही एकाचीही चौकशी
 दीपक विलास जाधव याचा जवळचा नातेवाईक असलेल्या वाशिम येथील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? याचा तपासही चंदननगर पोलिस करत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मात्र त्यादृष्टीने काही निष्पन्न झाले नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एकाचीही पोलिस चौकशी करीत असल्याची माहिती आहे.

 

 

Web Title: Mastermind of Pune robbery is Son-in-law of Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.