शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

 मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:28 IST

राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

-  ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या पृष्टभूमीवर विद्यार्थ्यांमधील भाषा विषयाची प्रगती जाणून घेतली असता राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही  कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नची संस्कृती रुजली आहे. मात्र या इंग्रजी शाळांपुढे अनेक मुल आपल्या मायबोलीला विसरत असल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. अनेक मुलांना मराठीतील आकडे कळत नाहीत किंवा मराठी पुस्तकाचे वाचन करता येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विद्यार्थ्यांचे मुलभूत वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘असर’कडून केल्या जाते. मराठी व गणित विषयातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे अनेक धक्कादायक वास्तव ‘असर’च्या अहवालातून समोर आले आहेत.  २०१८ च्या शैक्षणिक सत्रामध्ये शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांची निवड करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे विश्लेषण केलेली माहिती या अहवालातून समोर आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ७० ते ८० शाळांची निवड करण्यात आली होती.  या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता व गणित या विषयाचे मुल्यांकन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तक वाचायला लावले असता अमरावती विभागातून अवघ्या ४४ टक्के मुलांनाच वाचन करता आले.  यामध्ये राज्यात एकूण ५५.५ टक्के मुलांचा समावेश आहे. तर नागपूर विभाग ५३.८ टक्के, नाशिक ५४ टक्के, कोकण ६०.८ टक्के, औरंगाबाद ४८.७ टक्के, पुणे विभागात ७१.७ टक्के मुलांना वाचता येते.  राज्यात वाचू न शकणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४५.५ टक्के आहे. वाचनामध्ये राज्याच्या तुलनेत अमरावती विभागच सर्वात खाली असल्याचे दिसून आले. ‘असर’च्या या माहितीमुळे भाषा विषयांची गंभीर परिस्थिती अमरावती विभागात आहे. 

बॉक्स.....राज्यातील सहावी ते आठवीच्या २३ टक्के मुलांना वाचता येईना!राज्यात इयत्ता तिसरी ते पाचवी प्रमाणे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. यामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मुल्यांकन केले असता राज्यातील २३ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे दिसून आले. त्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणाºया पुणे विभागात १४ टक्के मुले वाचू शकत नसल्याचे आढळून आले. तर वाचन करता येत असलेल्या मुलांची टक्केवारी पुणे विभागात ८६, नागपूर ७५.२, नाशिक ७५, औरंगाबाद ७३.९, अमरावती ७२.६, कोकण विभागात ८१.७ टक्के मुलांना वाचन करता आले. 

 विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील ठरावीक शाळा निवडण्यात आल्या होत्या. या चाचणीमध्ये तिसरी ते पाचवीच्या मुलांना पाहिलीचे व सहावी ते आठवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. अमरावती विभागात तिसरी ते पाचवीचे ४१ टक्के व सहावी ते आठवीचे ७२.६ टक्के विद्यार्थी वाचू शकल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ‘असर’ने नुकताच अहवाल दिला आहे. - डॉ. रविंद्र आंबेकर, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन