शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:46 IST

मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला आहे.खामगाव तालुक्यातील शिर्ला परिसतील मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपूरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परसिरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिर्ला, कंचनपूर, बोथा, बोरी, अडगाव, आसा, दूधा, चिंचपूर, फतेपूर, गवंढाळा, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेडका, शहापूर अशा २१ गावांना पाणीपूरवठा करण्यात येतो. गतवर्षी सुरूवातीपासूनच अतिशय कमी पाऊस झाला. परिणामी नदी-नाल्यांना पूर गेले नाहीत. खरीपाचा हंगाम धोक्यात येण्याबरोबरच पिण्याचे पाण्याचे दर्भिक्ष्यही जाणवले. प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मन प्रकल्पाअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या २१ गावांची पाणी परिस्थिीतीही गतवर्षी अत्यंत बिकट बनली होती. परिसरात दुसरे कोणतेही पाण्याचे मोठे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या योजनेच्या भरवश्यावरच या परिसरातील नागरीकांची तहान आहे.परंतु यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सध्याच ५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी संपुर्ण पावसाळा संपुनही प्रकल्पात केवळ ३० टक्केच जलसाठा झाला होता. त्यामानाने यावर्षी सध्याच दुप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.परिणामी येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती नाही. परिसरातील नागरीकांना यावर्षी भरपूर पाण उपलब्ध राहणार आहे. वास्तविक पाहता, केवळ साडेसहा टक्के जलसाठ्याच्या भरवश्यावरच परिसरातील नागरिकांची तहान भागते. त्यामानाने यावर्षी प्रचंड जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

सिंचनासाठी उपलब्ध होणार पाणी!मन प्रकल्पावर २१ गावांची तहान अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पातून एरव्ही सिंचनासाठी देण्यात येणारे पाणी गतवर्षी बंद करण्यात आले होते. त्यामुळे रब्बीचे पिक घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना पिक वाचविताना कसरत करावी लागली होती. परंतु यावर्षी दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामासाठी शेतकºयांना प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर्षी निसर्गाने कृपा केल्याने सध्याच प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा झाला आहे. आणखी पावसाळा बाकी असल्याने जलसाठयात वाढच होईल. पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचाही प्रश्न मिटणार आहे.-चंद्रशेखर देशमुखशाखा अधिकारी, सिचंन शाखा शिर्ला.

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण