मलकापूर : दुचाकी अपघातात दोनजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:51 IST2018-07-07T16:50:27+5:302018-07-07T16:51:44+5:30
मलकापूर : मोटारसायकल दूभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना येथील बुलडाणा रस्त्यावरील एका किराणा दुकानासमोर शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

मलकापूर : दुचाकी अपघातात दोनजण गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मोटारसायकल दूभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना येथील बुलडाणा रस्त्यावरील एका किराणा दुकानासमोर शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
विनोद सोपान बांगर (वय ३०) रा. शिरसाळा ता. बोदवड व दीपक वसंता इंगळे (वय २९) रा. तालसवाडा ता.मलकापूर हे दोघेही युवक मोटारसायकलने शहराबाहेर जात असताना एका किराणा दुकानासमोर त्यांची मोटारसायकल दूभाजकावर आदळली. दोघांनाही जखमी अवस्थेत आधी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात तर रात्री बुलडाणा येथे हलविण्यात आले. जखमीपैकी विनोद बांगर याला उशिरा रात्री अकोला येथे हलविण्यात आले. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात तर दीपक इंगळे यांच्यावर बुलडाण्यात उपचार सुरु आहेत. (तालुका प्रतिनिधी)