शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:48 IST

खामगाव नगर पालिकेचे अतिक्रमण निमुर्लन पथक केवळ शहरातील फ्लेक्स आणि बोर्ड काढण्यापूरतेच मर्यादीत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणाच्या विळख्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र, अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिका स्तरावरून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते.खामगाव शहरातील बसस्थानक चौक ते जलंब नाका आणि जलंब नाका ते गोसे महाविद्यालय आणि सुटाळा पर्यंत शहरातून जाणाºया मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण पोफावत आहे. नगर पालिकेसमोर आणि बसस्थानक चौकातील अतिक्रमण आणि किरकोळ विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. नांदुरा रोडवरील विविध व्यापारी संकुलासमोरील अस्ताव्यस्त पार्कींग देखील शहरातील एक मोठी समस्या आहे. अतिक्रमण निमुर्लनाकडे पालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष असून, खामगाव नगर पालिकेचे अतिक्रमण निमुर्लन पथक केवळ शहरातील फ्लेक्स आणि बोर्ड काढण्यापूरतेच मर्यादीत असल्याचे दिसून येते. अगदी नगर पालिका कार्यालयानजीक असलेल्या अतिक्रमण निर्मुलनासाठी देखील पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाकडून पुढाकार घेण्यात नाही. त्यामुळे अतिक्रमण निमुर्लन पथकाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

 वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका!रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान नांदुरा रोडची एक बाजू वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे आधीच रहदारीस अडथळा निर्माण होत असताना, एका बाजूने तयार होणाºया सिमेंट रस्त्यांवर नांदुरा रोडवरील व्यापारी संकुलासमोर मोठ्याप्रमाणात दुचाकी पार्क केल्या जातात. नगर पालिकेच्या व्यापारी गाळ्यांसोबतच खासगी व्यापारी गाळ्यासमोरही हीच परिस्थिती कायम आहे. बसस्थानक चौक आणि रेल्वे स्थानकसमोर पार्कींगमुळे दररोज वर्दळीच्यावेळी वाहतूक कोंडी होते. ही समस्या नित्याचीच झाली असतानाही वाहतूक पोलिसांकडून केवळ बघ्यांची भूमिका घेतल्या जात असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावTrafficवाहतूक कोंडीEnchroachmentअतिक्रमण