शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:04 IST

बुलडाणा : राज्यामध्ये सावकारी कायदा लागू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही सावकारी पिळवणूकी थांबल्या नाहीत. तसेच शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मंजुर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या प्रलंबीत मागण्यांमुळे सवकारग्रस्त शेतकºयांची होरपळ होत आहे

बुलडाणा : राज्यामध्ये सावकारी कायदा लागू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही सावकारी पिळवणूकी थांबल्या नाहीत. तसेच शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मंजुर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या प्रलंबीत मागण्यांमुळे सवकारग्रस्त शेतकºयांची होरपळ होत आहे. त्यामुळे राज्यातील सावकारग्रस्त शेतकरी समिती आक्रमक पावित्र्यात आहे. सावकारग्रस्त शेतकºयांची प्रकरणे निकाली काढण्यास प्रशासनाकडून होणाºया विलंबाचा वारंवार शेतकºयांनाच फटका बसतो. गत चार वर्षापासून शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या विविध मागण्या मंजूर केलेल्या आहेत. परंतू अद्यापपर्यंत लागू न झाल्याने सावकारग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजना २०१४ मधील अपात्र शेतकºयांना उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाप्रमाणे कर्जदार शेतकºयांचे तारण असलेले सोने, चांदीचे दागीने शासनाने परत मिळवून न दिल्यामुळे समितीला उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे अवमान याचीका दाखल करावी लागली. अपात्र कर्जदार शेतकºयांचे सोने, चांदीचे दागिने परत मिळवून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८ मध्ये सावकारग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने घालून दिलेली तक्रार करण्याची कालमर्यादा आदिवासी कायद्याच्या धर्तीवर व मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ मधील तरतुदीप्रमाणे व मुदतीचा कायदा १९६३ चे कलम ६१ अ प्रमाणे १५ वर्षावरून ३० वर्षे वाढून मिळावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

हिवाळी अधिवेशनावर धडकणार सावकारग्रस्त शेतकरीसावकारग्रस्त शेतकरी समितीच्या अद्यापपर्यंत मंजूर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या विविध मागण्यांचा तातडीने पूर्ण करण्यात याव्या, सावकारग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब व परवानाधारक सावकारी कर्जदार शेतकºयांच्या मागण्यासाठी २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे हिवाळी अधिवेशनात सावकारग्रस्त शेतकरी समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सावकारग्रस्त शेतकरी, कर्जदार शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सहभाग राहणार आहे. सावकारी कायद्याची अंमलबजावणी व्हावीमहाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ मध्ये शिक्षेची तरतूद पाच वर्षावरून १० वर्षे करावी व दंडाची रक्कम ५० हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात यावी, सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या सावकारग्रस्त श्ोतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष अरूण इंगळे, संजय शिंदे, विशाल बावस्कर यांनी केल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी