शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:06 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतील फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचाराचा धुराळा चांगला उडत आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीतीलफेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचाराचा धुराळा चांगला उडत आहे. एकमेकांच्या सभेतील गर्दी, रिकाम्या खुर्च्या व विडंबनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रेस लागली आहे. त्यामुळे युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’ सध्या रंगात आलेले दिसून येत आहे. त्यात उमेदवारांचे वेगवेगळ्या नावाने काढलेल्या फेसबुक अकांऊटची संख्याही वाढली आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या नावाने आठ ते दहा फेसबुक अकाऊंट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रतापराव जाधव, शिवसेना बुलडाणा जिल्ह्या, माझी गर्जना शिवसेना व इतर वेगवेगळ्या नावाने फेसबुकवर अकाउंट आहेत. यामध्ये एका अकाऊंटचे फॉलोअर्स १ हजार ते १२०० च्या घरात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे १० ते १५ फेसबुक अकाऊंट आहेत. त्यात फॉलोअर्सची संख्या १० हजारच्या आसपास आहे. दोन्ही उमेदवारांच्या फेसबुक अकाऊंटवरून सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. व्हॉट्स अ‍ॅप गृ्रपचा युती व आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून प्रभावीपणे वापर सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह मतदानासाठी जनजागृती करून पक्षाचा संदेश पोहचविण्यासाठी ‘वॉर रूम’चे गठण करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाकडून प्राप्त संदेश कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुखांपर्यंत पोहचवून त्यांची अंमलबजावणी करण्याची कसरत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या या फुशारक्या अ‍ॅन्टी प्रचाराचे एक माध्यम झाले आहे. भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळवून आपले नेते किती भारी याचा पुरेपूर देखावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर कुणाच्या सभेत किती खुर्च्या खाली, कुणाच्या सभेत किती गर्दी झाली यावर कार्यकर्त्यांच्या फुशारक्या मारणे सुरू आहे.अशी चालते यंत्रणायुती व आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जात आहे.‘मी आहे, मतदार, माझा ....... हा आहे खासदार’ असे मतदारांचे फोटो टाकून संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे काम कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत.सकाळी ८ वाजेपासून रात्री १२ ते १ वाजेपर्यंत हे काम चालू असते. या चमुकडे जिल्ह्यातील मतदारांचा डेटा तयार असून दररोज व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून त्यांना संदेश पाठविण्यात येतात.प्रदेश स्तरावरून नेते, विद्यमान उमेदवारांची भाषणे जिल्हास्तरीय सभांची माहिती व्हायरल केली जात आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी यासाठी १२ कार्यकर्ते नियुक्त केले आहेत.विडंबनाचे व्हिडीओ व्हायरलसोशल मीडियावर सध्या विराधी पक्षाचे विडंबन करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. विरोधाकांच्या नेत्याचे भाषणाचा व्हिडीओवर एखाद्या चित्रपटाचा डायलॉग लावून त्याला व्हॉट्स अ‍ॅप ग्रृपवर फिरवले जात असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019buldhana-pcबुलडाणाcongressकाँग्रेसBJPभाजपाTwitterट्विटरFacebookफेसबुक