भरघाव ट्रकची अ‍ॅपेला धडक; चार गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:48 AM2020-06-21T11:48:34+5:302020-06-21T11:50:44+5:30

भरघाव ट्रकने अ‍ॅपेला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले.

A loaded truck hits Ape; Four seriously injured | भरघाव ट्रकची अ‍ॅपेला धडक; चार गंभीर जखमी 

भरघाव ट्रकची अ‍ॅपेला धडक; चार गंभीर जखमी 

Next

मलकापूरः भरघाव ट्रकने अ‍ॅपेला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले. नांदुरा तालुक्यातील वडनेर नजिक  रविवारी सकाळी हा अपघात घडला. जखमींवर मलकापूरात उपचार सुरू आहे.
  वडनेर भोलजी येथील रहिवाशी जुबेरखान अक्रमखान वय ३२,मुजीबखान मुबिनखान वय ३०,मो.परवेझ मो.हमीद वय २८,जुनेखान सुलेमानखान वय २५ असे चार जण अँपे रिक्षाने कामानिमित्त मलकापूरकडे निघाले होते.
वडनेर नजीक स्पिड ब्रेकरवर आज रविवारी सकाळी ८ वाजता अ‍ॅपेला भरघाव ट्रक क्र. एम.एच.१८/बि.जी.७११९ ने पाठीमागून जबर धडक दिली. त्यात अ‍ॅपे पलटी होवून त्यात बसलेले चारही गंभीर जखमी झाले.
त्यांना आधी  मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.(तालुका प्रतिनीधी)

Web Title: A loaded truck hits Ape; Four seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.