पद्मावती, करडी धरणातून गळती; सुरक्षा समिती करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:01 PM2019-08-10T14:01:01+5:302019-08-10T14:01:55+5:30

पद्मावती अर्थात मासरूळ लघु प्रकल्प आणि करडी धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते.

leakage from Padmavati, Karadi Dam; The Security Committee will conduct the survey | पद्मावती, करडी धरणातून गळती; सुरक्षा समिती करणार पाहणी

पद्मावती, करडी धरणातून गळती; सुरक्षा समिती करणार पाहणी

Next

- नीलेश जोशी 

बुलडाणा: विदर्भ मराठवाड्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पद्मावती (मासरूळ) आणि करडी धरणातून होत असलेल्या गळती प्रकरणी आता थेट धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंत्यांसह एक समितीच आता पाहणी करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही धरणांना धोका होण्यापूर्वीच अनुषंगीक उपाययोजना करण्याबाबात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता एन. सी. तायडे यांनी निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ जुलै रोजीच उपरोक्त दोन्ही धरणातून गळती होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर लगोलग नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता यांच्याकडून प्रकरणी तातडीने मार्गदर्शन मागविण्यात आले होते. आठ जुलै रोजी पद्मावती अर्थात मासरूळ लघु प्रकल्प आणि करडी धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. त्या पृष्टभूमीवर लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.
या प्रकारामुळे परिसरात भीतीदायक वातावरणही निर्माण झाले होते.


त्या अनुषंगाने बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने पाहणी करून मार्गदर्शन मागवले होते. प्रकरणाची गंभीरता पाहता धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता यांनीही तातडीने धोका टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने जीगाव प्रकल्प पूनर्वसन विभागाला या दोन्ही प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी त्वरेने कार्यवाही करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. पद्मावती (मासरूळ लघु प्रकल्प) धरणाच्या आऊटलेट पाईपमधून (हेड वेल) गळती होत असल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले होते. तर धाड जवळच्या करडी प्रकल्पातून सांडव्या लगतच्या संरक्षक भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते.
गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचीही ओरड स्थानिक ग्रामस्थ करीत होते. पद्मावती धरणाचे तुर्तास काम सुरू आहे. मात्र हे धरण बुलडाणा पाटबंधारे विभागाकडे सिंचनासाठी देण्यात आलेला आहे.
दरम्यान, आता २२ आॅगस्ट रोजी धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता एन. सी. तायडे, अमरावती जलसंपदा विभागचे मुख्य अभियंता ए. एन. बहादुरे व अन्य अधिकाºयांची समिती ही प्रत्यक्ष बुलडाणा जिल्ह्यात येऊन या दोन्ही धरणाची पाहणी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.


दुरुस्तीचे काम जिगाव प्रकल्प पूनर्वसन विभाग करणार
या दोन्ही धरणातील गळती रोखण्यासाठी बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या अधिनस्त असलेल्या जिगाव प्रकल्प पूनर्वसन विभागातंर्गत येत असलेल्या शेगाव येथील जिगाव प्रकल्प प्रकल्प पूनर्वसन उपविभाग एककडे दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आललेली आहे. मध्यंतरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या समक्ष याबाबतचा निर्णय झाला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.


पद्मावती आणि करडी धरणाच्या गळतीची पाहणी करण्यासाठी धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता व अन्य अधिकाºयांचा सहभाग असलेली समिती २२ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याबाबतही धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता यांनी निर्देशीत केले आहे.
- ए. एन. कन्ना
(कार्यकारी अभियंता बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा)

Web Title: leakage from Padmavati, Karadi Dam; The Security Committee will conduct the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.