शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर

By admin | Updated: May 2, 2017 23:45 IST

तळणी- बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत.

तळणी : शासनाकडून ग्रामीण भागातील गरोदर महिलांसाठी आरोग्यसंदर्भात विविध योजना राबविल्या जातात; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या योजनांना लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही; मात्र कोठल्याही शासकीय योजनेतून लाभ मिळण्याची प्रतीक्षा न करता बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत.बऱ्याचवेळा शासकीय योजनांमधून आजारपण असो वा बाळंतपण ग्रामीण महिलांना योग्य तो उपचार आणि सुविधा वेळेवर मिळत नाही. आर्थिक तसेच वैद्यकीय साधनांच्या अभावामुळे अनेकदा गरोदर महिलांना योग्य उपचार उपलब्ध होत नाही. त्यामुळे आई आणि बाळ या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. अशा गरोदर महिलांना सुविधा मिळावी, या उद्देशाने तळणी येथे ग्रामपंचायतने गरजू व गरोदर महिलांना हक्काचे माहेरघर उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गावातील महिलांना बाळंतपणात कुठलीही अडचण येऊ नये, त्यांची व नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी तसेच निगा राखली जावी, वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या तसेच सल्ला उपलब्ध व्हावा, यासाठी माहेरघराची निर्मिती करण्यात आली. या माहेरघरात गरोदर महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच पलंग तसेच कूलरची व्यवस्था करण्यात आली. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच आशा विठ्ठल नारखेडे यांनी केले आहे. आय.एस.ओ.मानांकन प्रमाणपत्रसुद्धा तळणी ग्रामपंचायतला मिळाले आहे.