शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

लोकमत स्टीग ऑपरेशन; मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे बुलडाणा जिल्हाआरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर बदलत्या वातावरणाने तालुकाभर डेंग्युसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच खाजगी रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. परंतू, मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील रुग्ण वार्‍यावर असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने ३१ ऑगस्ट रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णने समोर आले असून, ग्रामीण रुग्णालयाचा कारभारही चव्हाट्यावर आणला.मेहकर व लोणार तालुक्यात डेंग्यु आणि मलेरियाने थैमान घातले असून शहरातील रुग्णालये हाऊस फुल्ल झाली आहेत. डेंग्यु सदृश्य तापेमुळे मेहकर व लोणार तालुक्यातील दोन जण दगावल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. तसेच मेहकर शहरासह तालुक्यात व लोणार तालुक्यातील पिंपळनेर, किन्ही, कोयाळी, सरस्वती, याठिकाणीही डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर विविध कारणांमुळे साथीच्या आजारानेही डोकेवर काढले आहे. सद्यस्थितीत शासकीय तसेच खासगी रुग्यालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये डायरिया व टायफाईडचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे आढळुन आले आहे. परंतू, या साथिच्या आजारावर नियंत्रण घालण्यास आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. गोरगरिंब रुग्णांना जिवनदायी म्हणुन ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. आजही सर्वाधिक रुग्णांची मदार ग्रामीण रुग्णालयावर आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या १९ कर्मचारी कार्यरत असून, चार जागा रिक्त आहेत. मात्र, ड्युटीवर असलेल्यापैकी रुग्णालयात केवळ एकच परिचर हजर दिसून आला ; तर २५ रुग्ण उपचारार्थ भर्ती होते. वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या रिकाम्या खुच्र्या यावेळी लोकमत प्रतिनिधीना दिसून आल्या. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रुग्णालय परिसरात गाजर गवतही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण रुग्णालयातील अपुर्‍या सुविधांमुळे व डॉक्टरांच्या दुर्लक्षीमुळे रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचेही वास्तव लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन मधुन समोर आले आहे. *रुग्णांचे हाललोकमत चमू ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १२.१५ वाजता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी संपुर्ण रुग्णालयाची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला फॅन हवा मारत असल्याचे दिसून आले. तर वैद्यअधिकारी व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय झाली होती.*रिक्तपदांचा बोझाभेटी दरम्यान रुग्णालयातही एकही डॉक्टर आढळून आला नाही. त्यानंतर प्रत्येक वार्डात जाऊन पाहिले असता, एकच परिचर संपुर्ण रुग्णांची देखभाल करीत होता. यासंदर्भात माहिती घेतली असता आज रविवार असल्यामुळे शक्यतोवर डॉक्टर हजर राहत नाहीत अशी माहिती मिळाली. या ग्रामीण रुग्णालयात १९ कर्मचारी कार्यरत आहे. इतर चार पदे रिक्त आहेत. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक व लॅब टेक्नीशन यांचा समावेश आहे.