शेगाव (जि. बुलडाणा) : येथील सरकारी फैलमध्ये राहणारा जितेंद्र भागवत या १६ वर्षीय मजूर युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना २0 जानेवारी रोजी सायंकाळी ५.३0 वाजेच्या सुमारास घडली.खामगाव येथील भागवत कुटुंब शेगाव येथे दोन वर्षांंपासून वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील जितेंद्र संजय भागवत हा शेगाव येथील अग्रसेन चौकातील पूजा बिछायत केंद्रात मजूर म्हणून कामावर होता. सायंकाळी गौलखेड रोडवर बिछायतचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}