शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबासच्या याद्या पुन्हा मागविल्या

By admin | Updated: January 30, 2015 01:09 IST

निवडणूक प्रक्रिया आणखी ८ दिवस लांबणार.

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी तब्बल अडीच महिने मतदार यादी पाठविण्याचे पत्र दडवून निवडणुकीत खोडा घातल्याचे उघड झाल्यानंतर पाठविलेल्या याद्याही विविध नमुन्यात व मराठी अक्षराप्रमाणे पाठविण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या याद्या स्वीकारल्याच नसून योग्य नमुन्यात याद्या पाठविण्याची सूचना केली आहे.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २0१४ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडून सुरुवात करण्यात येवून त्वरित मतदार याद्या पाठविण्याचे फर्मान पाठविले होते. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने व्यापारी मतदार संघ व हमाल मापारी मतदार संघाच्या याद्या त्वरित पाठविल्या; मात्र खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी अडीच महिने पत्र मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत याद्या पाठविल्या नाहीत. दरम्यान, लोकमतने वृत्त प्रकाशित करताच गटसचिव संघटनेचे पदाधिकारी मानकर व गटविकास अधिकारी यांनी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघाच्या याद्या २0 जानेवारीला दरम्यान पाठविल्या. या याद्या सहायक निबंधक कार्यालयाकडून सदर याद्या आज २९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविल्या; मात्र याद्या योग्य प्रारुप व मसुद्यामध्ये नसल्याने त्या परत पाठविण्यात आल्याने आणखी निवडणूक प्रक्रिया ८ दिवस लांबणार असून, याद्या जिल्हा उपनिबंधकाकडे दुरुस्तीनंतर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल व त्या प्रारुप याद्यांवर हरकती मागवून याद्या तयार होतील व निवडणुका लागतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत.