खामगाव कृउबासच्या याद्या पुन्हा मागविल्या

By Admin | Updated: January 30, 2015 01:09 IST2015-01-30T01:09:22+5:302015-01-30T01:09:22+5:30

निवडणूक प्रक्रिया आणखी ८ दिवस लांबणार.

Khamgaon re-orders the numbers of Curubas | खामगाव कृउबासच्या याद्या पुन्हा मागविल्या

खामगाव कृउबासच्या याद्या पुन्हा मागविल्या

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी तब्बल अडीच महिने मतदार यादी पाठविण्याचे पत्र दडवून निवडणुकीत खोडा घातल्याचे उघड झाल्यानंतर पाठविलेल्या याद्याही विविध नमुन्यात व मराठी अक्षराप्रमाणे पाठविण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या याद्या स्वीकारल्याच नसून योग्य नमुन्यात याद्या पाठविण्याची सूचना केली आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २0१४ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडून सुरुवात करण्यात येवून त्वरित मतदार याद्या पाठविण्याचे फर्मान पाठविले होते. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने व्यापारी मतदार संघ व हमाल मापारी मतदार संघाच्या याद्या त्वरित पाठविल्या; मात्र खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी अडीच महिने पत्र मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत याद्या पाठविल्या नाहीत. दरम्यान, लोकमतने वृत्त प्रकाशित करताच गटसचिव संघटनेचे पदाधिकारी मानकर व गटविकास अधिकारी यांनी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघाच्या याद्या २0 जानेवारीला दरम्यान पाठविल्या. या याद्या सहायक निबंधक कार्यालयाकडून सदर याद्या आज २९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविल्या; मात्र याद्या योग्य प्रारुप व मसुद्यामध्ये नसल्याने त्या परत पाठविण्यात आल्याने आणखी निवडणूक प्रक्रिया ८ दिवस लांबणार असून, याद्या जिल्हा उपनिबंधकाकडे दुरुस्तीनंतर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल व त्या प्रारुप याद्यांवर हरकती मागवून याद्या तयार होतील व निवडणुका लागतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Khamgaon re-orders the numbers of Curubas