शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

 #खामगाव कृषि महोत्सव : माधुरी वाणाच्या फुलकोबीने वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:40 PM

खामगाव : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कृषि महोत्सवामध्ये जिल्ह्यातील दर्जेदार व भरघोस उत्पादन घेणाºया शेतकऱ्यांनी  पिकविलेले फळ, भाजीपाला यासह विविध प्रकारचे वाण प्रदर्शनीत मांडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांनी उत्पादीत केलेले फळ, भाजीपाला, फुले यासह विविध प्रकारच्या पीकांचे वाण या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.खामगाव तालुक्यातील उल्हास निंबाजी दाभाडे या शेतकºयांने ०.१० हेक्टर क्षेत्रावर माधुरी वाणाच्या फुलकोबीचे १.५० लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले आहे.मुख्यमंत्र्यासह येणाºया प्रत्येकाचे लक्ष माधुरी वाणाच्या फुलकोबीने वेधले.

- ब्रम्हानंद जाधव

खामगाव : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कृषि महोत्सवामध्ये जिल्ह्यातील दर्जेदार व भरघोस उत्पादन घेणाºया शेतकऱ्यांनी पिकविलेले फळ, भाजीपाला यासह विविध प्रकारचे वाण प्रदर्शनीत मांडण्यात आले आहेत. यामध्ये माधुरी या वाणाच्या फुलकोबीचा दर्जा पाहून मुख्यमंत्र्यांनीही शनिवारला प्रदर्शनीच्या पाहणीदरम्यान या फुलकोबीविषयी माहिती जाणून घेतली. खामगाव येथे सुरू असलेल्या कृषि महोत्सवामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालायाने जिल्ह्यात काही शेतकऱ्यां  उत्पादीत केलेले फळ, भाजीपाला, फुले यासह विविध प्रकारच्या पीकांचे वाण या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यमंत्र्यासह येणाºया प्रत्येकाचे लक्ष माधुरी वाणाच्या फुलकोबीने वेधले. खामगाव तालुक्यातील उल्हास निंबाजी दाभाडे या शेतकऱ्यांने ०.१० हेक्टर क्षेत्रावर माधुरी वाणाच्या फुलकोबीचे १.५० लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले आहे. कमी कालावधीत भरघोस उत्पन्न या फुलकोबीतून मिळते. तसेच ही फुलकोबी आकाराने अत्यंत मोठी व दर्जेदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्वत: फुलकोबीची माहिती जाणून घेतली. तसेच चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील रविंद्र प्रकाश सुरोशे यांनी पिकविलेली पपई, डोणगाव येथील पंचफुला जगदेवराव आखाडे यांनी पीकविलेली केळी, मोताळा तालुक्यातील सिंदखेड  येथील  दिलीप मोरे यांनी पाणकोबी, बुलडाणा तालुक्यातील चोंडोळ येथील मदानसिंग चांदा यांनी मोसंबी, डोणगाव येथील संतोष आखाडे यांनी संत्रा, मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सदाशिव गुजर यांनी टोमॅटो, लोणार तालुक्यातील सरस्वती येथील अनिल दुधमोगरे यांनी द्राक्ष, देऊळगाव राजा तालुक्यात खल्ल्याळ ग. येथील विठोबा दंदाले यांनी अंजिर, दुसरबीड येथील शे.अब्दुल शे.करीम यांनी शेवंती, गुलाब, बोथा येथील मदन दौलत बोराडे यांनी पपई, मेहकर येथील गणेश सौभागे यांनी शेवंती हे वाण प्रदर्शनात मांडले आहे. फळ, भाजीपाला, फुले आदी पिकांच्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध वाणाची माहिती शेतकºयांना मिळत असून, उत्कृष्ट वाण शेतकऱ्यां  दिशादर्शक ठरत आहे. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस