शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबास सभापती, सचिवास पोलीस कोठडी

By admin | Updated: May 8, 2017 02:26 IST

रविवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खामगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदीत घोटाळा झाल्याचे तक्रारीवरून सभापती, उपसभापती, सचिवासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी सभापती व सचिवास शनिवारी अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गत नोव्हेंबर महिन्यात खामगाव कृउबासमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी करण्यासाठी बाजार समितीच्यावतीने वृत्तपत्रात जाहीर नोटिस देऊन नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले; परंतु यामध्ये सर्वात कमी दराचे दरपत्रक सादर करणार्‍या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी करण्याचे प्रावधान असताना बाजार समितीकडून प्रो.प्रा. महालक्ष्मी सेल्स यांचे ज्यादा दराचे दरपत्रक मंजूर करण्यात आले. बाजारात ७000 रुपये प्रतिनग या दराने उपलब्ध असलेले वजन काटे बाजार समितीने तब्बल १४,४५0 रुपये प्रतिनग दराने १00 वजन काट्यांची खरेदी करण्यात आली. यामध्ये ज्यांचेकडून वजन काटे खरेदी करण्यात आले, ते महालक्ष्मी सेल्स हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नसल्याचे व त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. यासंदर्भात बाजार समितीचे संचालक प्रकाश टिकार व अशोक हटकर यांनी ३ जानेवारी २0१७ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीवरून झालेल्या चौकशीनंतर खामगाव येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक महेश कृपलानी यांनी शनिवार, ६ मे रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दीपके, संचालक विलास इंगळे, प्रमोद चिंचोळकर, सचिव दिलीप देशमुख व महालक्ष्मी सेल्स तर्फे प्रोप्रायटर रा. मोरगाव दिग्रस ता. शेगाव यांच्याविरुद्ध भादंवि कलम १२0 ब , ४0६, ४२0, ४६५, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी सभापती टाले व सचिव देशमुख यांना अटक केली होती. दरम्यान, रविवारी कृउबास सभापती व सचिवास येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.