शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:26 IST

मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक, वळण मार्ग आणि नाल्यांवरही अतिक्रमण वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत नाल्या आणि मोठ्या नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा आहे. शहरातील रस्त्यांवरील आणि मुख्य चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी दुर्लक्ष होत असतानाच, नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठीही कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्याचवेळी शहरातील अतिक्रमण काढताना दुजाभाव केल्या जात असल्याचीही सामान्यांची ओरड आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून खामगाव शहराचा नावलौकीक आहे. मात्र, गत काही वर्षांपासून या शहराला अतिक्रमणाचा विळखा आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढताना भेदभाव केल्या जात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निमुर्लन करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांमध्येच आहे त्या ठिकाणीच पुन्हा अतिक्रमण जैसे थे होते. त्यामुळे पालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहिम एक फार्स ठरत असल्याचे दिसून येते.शहरातील काही अतिक्रमणांना स्थानिक राजकीय व्यक्तीचे पाठबळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे नटराज गार्डन जवळील अतिक्रमण काढताना राजकीय व्यक्तीशी निगडीत असलेल्या अतिक्रमकांचे अतिक्रमण न काढता किरकोळ विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण हटवितानाही काही अतिक्रमकांना झुकते माप देण्यात आले. जगदंबा रोडवरील एका पाणटपरीच्या संचालकांना अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याचे पाठबळ आहे. त्यामुळे गत कित्येक वर्षांपासून ही पानटपरी रस्त्यातून हटविण्यासाठी कुणाचीही हिंमत होत नाही. नगर पालिका कार्यालयानजीक काही अतिक्रमणांचीही हीच परिस्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अतिक्रमण हटवितानाही पालिका प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. रस्ता विस्तारीकरणा दरम्यान, एका हॉटेल व्यावसायिकासोबतच या रस्त्यावरील काही किरकोळ विक्रेत्यांना पक्के अतिक्रमण काढताना झुकते माप देण्यात आले होते. थोडक्यात अतिक्रमण निमुर्लनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक, वळण मार्ग आणि नाल्यांवरही अतिक्रमण वाढत आहे.जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल!खामगाव शहरातील अतिक्रमणाचे सचित्र वृत्तांकन ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत केल्या जात आहे. त्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील काही भागातील किरकोळ अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करीत खामगावात अतिक्रमण निमुर्लन मोहिम सुरू असल्याचा कांगावा केल्या जात आहे. यामाध्यमातून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. वस्तुस्थितीत गत आठवड्यात पालिकेने शुक्रवारी शहर पोलिस स्टेशन समोरील अतिक्रमण काढले. अवघ्या तीनच दिवसांत याठिकाणचे अतिक्रमण जैसे थे झाले आहे, हे येथे विशेष!नाल्यावर बांधकाम करून अतिक्रमण!शहरातील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा असतानाच प्रमुख बाजारपेठेतील नाल्यांवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील एका मोक्याच्या वस्तीतील नालीवर इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडून कोणतीही उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :khamgaonखामगावEnchroachmentअतिक्रमण