शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील ३0 विहिरी धोकादायक!

By admin | Updated: January 17, 2015 00:16 IST

अनेक विहिरी कठड्याविनाच, अनेक विहिरींच्या झाल्या कचराकुंड्या.

गिरीश राऊत/ खामगाव (जि. बुलडाणा):नगरपालिकेच्या ताब्यातील तसेच शहरातील सार्वजनिक असलेल्या ३५ पैकी तब्बल ३0 विहिरी धोकादायक असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या पाहणीत आढळून आले. यापैकी बहुतांश विहिरींना कठडे नसल्याचे चित्र असून, अनेक विहिरींना कचरा कुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शहरातील ३५ पैकी फक्त ५ विहिरीच वापरात आहेत, तर उर्वरित विहिरी कचरा टाकण्याचे ठिकाण होत आहे. तर काल पतंग पकडण्याच्या नादात गाळ असलेल्या विहिरीत बालक पडल्याने तसेच याआधीही न.प. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीतील गाळ काढण्याच्या प्रयत्नात ४ तरुणांचा बळी गेल्याने या विहिरी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे. खामगाव शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या सिव्हिल लाईन भागातील सप्तश्रृंगी देवी मंदिरामागील विहीर, न.प. दवाखाना परिसरातील विहीर, बालाजी प्लॉट, चांदमारी, शंकरवार हॉस्पिटलसमोर, समता कॉलनी, रायगड कॉलनी, भाजी बाजार, तसेच शहरातील जुन्या व नवीन वस्तीमध्ये अशा ३५ सार्वजनिक विहीर विविध रहिवासी भागात आहेत. मात्र शहरात नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने तसेच नवीन वस्त्यांमध्ये प्लॉटधारकांनी स्वत:च्या आवारात विहिरी खोदल्याने यापैकी फक्त ५ विहिरी वापरात असल्याचे दिसून आले. यामधील श्रीराम चौकातील विहीर, न.प. इमारतीमागील विहिरीचा वापर अग्निशमन दलासाठी होतो. तर न.प. मैदानावरील विहीर ही गणेश व देवी विसर्जनासाठी उपयोगात येते; मात्र इतर विहिरी कचराकुंड्या झालेल्या दिसून आल्या. या विहिरीत कचरा सडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच अनेक नागरिकांनी स्वत:च्या जागेत विहिरी खोदल्या आहेत. त्यामुळे त्या विहिरींचे पाणीसुद्धा यामुळे दूषित होतो; मात्र या विहिरींची गाळ काढून स्वच्छतासुद्धा होत नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळीसुद्धा बसविण्यात आलेली नाही. संभाव्य पाणीटंचाई पाहता विहीर उपयोगात आणणे सोयीचेच ठरणार आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरातील सार्वजनिक विहिरीतील कचरा काढावा तसेच या विहिरीतील पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी विहीर असलेल्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.