शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात भाजपला झुकते माप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:12 IST

खामगाव: तालुक्यातील १६ पैकी एका ग्रामपंचायतीवर  निवडणुकीपूर्वीच अविरोध सत्ता काबिज केल्यानंतर सोमवारी  जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने ९ ग्रामपंचाय तीवर दावा ठोकला. त्यामुळे खामगाव तालुक्यात भाजपला  झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या  जागांवरील सरपंच पदावरून दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये  टकरावही झाला. तथापि, या टकरावानंतरही भाजपच वरचढ  असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देराजकीय कुरघोडी आकाश फुंडकारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील १६ पैकी एका ग्रामपंचायतीवर  निवडणुकीपूर्वीच अविरोध सत्ता काबिज केल्यानंतर सोमवारी  जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने ९ ग्रामपंचाय तीवर दावा ठोकला. त्यामुळे खामगाव तालुक्यात भाजपला  झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या  जागांवरील सरपंच पदावरून दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये  टकरावही झाला. तथापि, या टकरावानंतरही भाजपच वरचढ  असल्याचे दिसून आले.खामगाव तालुक्यात १६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया  पार पडली. या निवडणूक प्रक्रीयेतील अंतिम टप्पा असलेल्या  मतमोजणीत सोमवारी खामगाव तालुक्यात अनेक महत्वपूर्ण  घडामोडी घडल्या. १६ पैकी कोंटी ग्रामपंचायतीवर भाजपने सर पंचपदासह सहा सदस्य अविरोध निवडून आणले. त्यानंतर  सोमवारी मतमोजणी दरम्यान, १६ पैकी ९ ठिकाणी भाजप सम िर्थत सरपंच पदाचे उमेदवार आणि पॅनलमधील सदस्य विजयी  झाले. तर दोन ठिकाणी भाजपचे पॅनल विजयी झाले तर, सरपंच पदी अपक्ष उमेदवार विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी भाजप- काँग्रेसमध्ये टकराव झाल्याचे दिसून आले. तर कवडगाव ग्राम पंचायतीमध्ये भाजप सर्मथक उमेदवार विजयी झाला मात्र,  विजयाची माळ गळ्यात पडताच कवडगावच्या  सरपंचानी  ‘जनसंपर्क’चा रस्ता धरला. काँग्रेसकडून त्यांचा सत्कारही  झाला. मतदार संघातील विकास कामांना मतदारांनी कौल  दिल्याची भूमिका खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश  फुंडकर यांनी मांडली. त्याचवेळी मतदार संघात सन २0१४  पासून सुरू असलेली परिवर्तनाची लाट कायम असल्याचे दिसून  आले. काँग्रेसने नंबरवनचा दावा केला असला तरी, कवडगाव,  सजनपुरी, वडजीभेंडी, जळका तेली या ठिकाणीच यश मिळाले.  तर लोखंडा येथे भारिपच्या मदतीने काँग्रेसला सत्ताकाबीज करता  आली. तथापि, जळका तेली येथील सरपंच पदाचे उमेदवार  काँग्रेसच्या तंबूतून भाजपकडे सामिल झाल्याने, खामगाव मतदार  संघात भाजपची सरशी झाल्याचे दिसून येते.