ISO rating for Shegaon Railway Station | शेगाव रेल्वेस्थानकाला 'आयएसओ' मानांकन
शेगाव रेल्वेस्थानकाला 'आयएसओ' मानांकन

- अनिल उंबरकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावसह मलकापूर रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हयाचा सन्मानात वाढ झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव हे संत गजानन महाराज समाधी मंदिरामुळे सर्वत्र प्रसिध्द आहे. श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात. असंख्य भाविक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे यात्रेकरूच्या माध्यमातून शेगाव रेल्वे स्टेशन ला चांगले उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळेच शेगाव रेल्वे स्टेशनला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून स्वच्छता अभियान यशस्वी रित्या राबविले. रेल्वे स्टेशन वर नियमित स्वच्छतेला महत्व दिल्या गेले. सोबतच प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा मिळवून देण्यावर स्टेशन प्रशासनाकडून नियमितपणे भर दिल्या जात आहे. स्टेशन परिसरात नियमित साफसफाई मुळे स्टेशन निटनेटके स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांनाकडून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे. मागील आठवड्यात स्टेशन परिसराची आय. एस. ओ मानांकनाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाच्या टीम ने भेट देवून पाहणी केली. तसेच विदर्भ प्रवेशद्वार मलकापूर रेल्वे स्टेशन ला सुध्दा आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. सर्वांच्या सहकार्याने रेल्वे स्टेशनला निटनेटकेपणा आला आहे. रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांचाही चांगले योगदान आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा प्राप्त करून देण्यात येत असल्याने आनंद असल्याची प्रतिक्रिया स्टेशन प्रबंधक पी एम पुंडकर यांनी दिली. नगराध्यक्षा शकुंतला बुच यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले असून रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे.


मलकापूर व शेगाव रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. ही बुलडाणा जिल्ह्यातील जनतेसाठी गौरवास्पद बाब आहे.
- ना.डॉ.संजय कुटे,
पालकमंत्री

Web Title: ISO rating for Shegaon Railway Station

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.