शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या संपर्कातील चौघांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:52 IST

दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे.

दुसरबीड: यवतमाळमध्ये मृत्यू पावलेल्या एका कोरोना बाधीत ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे. सदर ट्रक चालकाने दुसरबीड येथील एका ढाब्यावरून ३१ मे जेवणाचे पार्सल घेतले होते. मात्र रस्त्यामध्ये या ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तो चालक पॉझिटिव्ह निघाला. ट्रक चालकाच्या सहाय्यकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर थेट व्हीडीओ कॉल करून किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ यांनी संबंधीत ढाब्याची खातरजमा केली. त्यानंतर तहसिलदार, ठाणेदार व आरोग्य विभागाच्या पथकाने या धाब्यावरील चौघांना बुलडाणा येथे आरोग्य तपासणीसाठी पाठवले आहे. यामध्ये दुसरबीड येथील एक, तढेगाव गाव येथील एक व केशव शिवणी येथील दोन अशा चौघांचा समावेश आहे.दुसरबीड वरून नागपूर-औरंगाबाद हायवे जातो. सध्या हॉलेट बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतंर्गत माल घेवून जाणाºया ट्रक चालक व वाहन चालकांचे हाल होत आहे. दरम्यान, नागपूरकडे माल घेवून जाणाºया एका ट्रक चालकाने दुसरबीड येथील एका ढाब्यावरून ३१ मे रोजी जेवणाचे पार्सल घेतले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचताच त्याची तब्यत खराब झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा स्वॉब नमुन्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने मृत चालकाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्याच्या क्लिनरच्या मदतीने काढले असता दुसरबीड येथील एका ढाब्यावरून त्यांनी जेवणाचे पार्सल घेतले होते, असे समोर आले. त्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनाने बुलडाणा जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉल करून संबंधित ढाबा तोच आहे का? याची खातरजमा केल्यानंतर तेथील चौघांना आरोग्य विभागाच्या मदतीने बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या