शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजात अवैध दारू विक्री

By admin | Updated: April 10, 2017 00:32 IST

उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : दुप्पट किमतीने होते दारू विक्री

देऊळगाव राजा : महामार्ग तथा राज्य महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने या मार्गावरील दारू विक्री दुकाने तथा बीअर बार बंद करण्याचा आदेश दिल्यानंतरही शहर परिसरात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, उत्पादन शुल्क तसेच पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच दारू विक्रेते मूळ किमतीच्या दुप्पट किमतीने खुलेआम दारू विकत असल्याचे पहावयास मिळत आहे.देऊळगाव राजा शहरामध्ये व परिसरात देशी दारू, बीअर शॉपी तसेच बीअर बार, अशी एकूण २७ दुकाने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून सर्वच दारूची दुकाने बंद झाली असली, तरी शहर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू करून उच्छाद मांडला आहे. दररोज लाखो रुपयांची दारू विक्री होत असून, याकडे पोलीस तथा उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे. विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा शहरामध्ये चोरट्या मार्गाने दारू माफिया दारूसाठा उपलब्ध करीत आहेत. व्यसनाधिन झालेल्या मजुरांना दारूसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वप्रथम महिला वर्गाकडून स्वागत झाले. आतातरी घरातील कर्ता पुरुष दारूच्या अधीन होणार नाही, अशीच काही अपेक्षा या महिलांची होती. मात्र आठ दिवस उलटूनही दारूची अवैध विक्री सुरू असल्याने कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. शहरापासून अवघ्या २५ कि.मी.वर असलेल्या जालना शहरातील काही वाईन शॉप बीअर बार व दारू विक्रीची दुकाने सुरू असल्याने देऊळगाव राजा शहरातील दारू विक्रेते या ठिकाणाहून दारू आणून शहरात दुप्पट भावाने विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात बनावट दारूचा साठा सुद्धा शहरात उपलब्ध होऊन त्यातून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अवैध दारू विक्रीकडे लक्ष देऊन उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस विभागाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.