शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे गटसचिवांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 10, 2015 00:04 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; नऊ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बेमुदत उपोषणाचा इशारा.

चिखली (जि. बुलडाणा): जिल्ह्यातील सुमारे १५0 गटसचिवांचा पगार गेल्या नऊ महिन्यांपासून न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे जिल्हा देखरेख संस्था यासंदर्भातील आपली जबाबदारी झटकत असल्याने गटसचिवांच्या अडचणीत भर पडत असून, अनेक गटसचिवांच्या पाल्यांचा शिक्षणाचाही प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गटसचिवांच्या पगाराची रक्कम संबंधित संस्थेकडे भरण्यास मनाई केल्यामुळे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडे निधी नसल्याचे कारण दाखवून जिल्ह्यातील गटसचिवांचे ऑक्टोबर २0१४ ते जून २0१५ पर्यंतचा तब्बल नऊ महिन्यांचा पगार थकला आहे. विशेष म्हणजे, सद्यस्थितीत जिल्हा देखरेख सहकारी संस्था आणि जिल्हा सहकारी बँक या दोन्ही ठिकाणी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक काम पाहत आहेत. असे असताना गटसचिवांना तब्बल नऊ महिन्यांपासून वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप बुलडाणा जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव मेरत यांनी केला आहे. बँक आणि गटसचिवांच्या कामकाजाचे उद्दिष्ट एकच असतानाही बँकेतील कर्मचार्‍यांना नियमितपणे वेतन देण्यात येते, तर गटसचिवांना पगाराबाबत का डावलण्यात येते, हा प्रश्न उपस्थित करून संघटनेने जिल्हा देखरेख सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडे वारंवार मागणी करूनही थातूरमातूर उत्तरे देऊन गटसचिवांची केवळ शाब्दिक बोळवण केली जात आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या वसुलीबाबत गटसचिवांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपेक्षा सक्षमतेने काम करून कर्जवसुली मोठय़ा प्रमाणावर केली असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.