शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले भूमी अभिलेख’ उलगडणार भूमापनाचा इतिहास!

By admin | Updated: April 10, 2017 00:01 IST

बुलडाणा- १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूप प्रदर्शनातून भूमापनाचा इतिहास उलगडणार आहे.

आज भूमापन दिन : बुलडाणा येथे चित्र प्रदर्शन

बुलडाणा : सिंधू संस्कृतीत कोनमापक यंत्राने जमिनीची मोजणी होत असल्याचे इतिहासाद्वारे उलगडले आहे; मात्र आता विज्ञानाने विलक्षण झेप घेतली असून, जमिनीचे मोजमाप आता थेट उपग्रहाद्वारे होत आहे. १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूप प्रदर्शनातून भूमापनाचा इतिहास उलगडणार आहे. राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत पूर्वी झालेल्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे अभिलेख जतन केले जातात. विभागामार्फत जमिनीची हद्द कायम मोजणी केली जाते, तसेच वेळोवेळी जमिनीच्या अभिलेखात सुधारणा करून त्यांचे मालकी हक्क अबाधित राहण्यासाठी खाते प्रयत्नपूर्वक अभिलेख दुरुस्तीची कार्यवाही करते. एकेकाळी शंखू साखळीद्वारे सर्वेक्षण करणारा भूमी अभिलेख विभाग आज हद्द कायम मोजणी करण्यासाठी फलकयंत्राचा वापर करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भूमी अभिलेख खात्यामार्फत ईटीएस मशीनसारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून अचूक मोजणीचे काम केले जाते. नवीन मोजणी तंत्रज्ञानामुळे सुमारे ३०-३५ एकरांचे मोजणीचे काम करून संगणकावर आज्ञावलीद्वारे नकाशा तयार होतो. सिंधू संस्कृतीत कोनमापक यंत्राने होणारे जमिनीचे मोजमाप त्यानंतर या पद्धतीत होत गेलेली स्थित्यंतरे आणि आता थेट उपग्रहाद्वारे भूमापनासाठी सज्ज झालेला भूमी अभिलेख विभाग १० एप्रिल रोजी भूमापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्ताने जिल्हा भूमी अभिलेख बुलडाणा, उपअधीक्षक भूमी अभिलेख, बुलडाणा या कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ या नावाचे भूमी अभिलेखाविषय, भूमापनाचा इतिहास उलगडून दाखविणारे चित्ररूपी प्रदर्शन उपअधीक्षक भूमी अभिलेख बुलडाणा या कार्यालयात आयोजित केले आहे. भूमापनासाठी आधुनिक यंत्रणेचे साहाय्यभूमापनासाठी आधुनिक यंत्रणेचे साहाय्य घेतले जात असल्याने भूमापनही अचूकपणे होत आहे. भूमी अभिलेख विभागाने सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचा पुनर्मोजणी करण्याचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतलेले आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या प्रतिमांचा वापर करून जमिनीच्या मोजणीचे काम अचूक होणार आहे. जमिनीचे मोजमाप आता थेट उपग्रहाद्वारे भूमापनासाठी सज्ज झाले आहे. भूमापनाचा इतिहास नागरिकांना माहिती व्हावा, यासाठी १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूपी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन हे दिवसभर खुले राहणार आहे.- सु.प्र. जाधोर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख बुलडाणा.