शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासीक मोती समाधिस्थळ दुर्लक्षित

By admin | Updated: January 26, 2015 00:52 IST

देऊळगावराजा येथील ऐतिहासीक मोती समाधिस्थळाक डे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.

अशरफ पटेल/ देऊळगावराजा (बुलडाणा):जुन्या सिंदखेड राजा रस्त्यावरील माळीपुरा भागातील सावतानगर परिसरात असलेले ऐतिहासिक मोती समाधिस्थळ पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे. येथे फक्त फलक आणि प्राचीन काळातील विनातारेचा लोखंडी दरवाजा व खांब रोवलेले आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.राजे लखुजी जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक मोती समाधी देऊळगाव राजा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सर्वे नंबर २५/0१ मध्ये आहे. या ठिकाणी जिवंत गोड्या व खार्‍या पाण्याचा झरा असलेली विहीर आहे. याशिवाय प्राचीन काळातील दगडी कारंजे आहेत. असा ऐतिहासिक वारसा जतनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोती समाधिस्थळ नामशेष होण्याचा मार्गावर आहे. देऊळगावराजा शहरापासून ६0 कि.मी. अंतरावर असलेल्या लोणार येथे पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. या विभागाचे प्राचीन काळातील वास्तू जतन करणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यासाठी निधीही देण्यात येतो; परंतु पुरातत्त्व विभागाकडून निधीचा योग्य वापर होत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेल्या देऊळगावराजा परिसरातील ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला आहे. या मोती समाधिस्थळावर सद्य:स्थितीत चौकीदार नाही. सर्वत्र गाजरगवत असून, मोठी झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे ऐतिहासिक बारवेचे अस्तित्व नष्ट झाले आहे. साफसफाई नसल्यामुळे दुर्लक्षित असलेल्या या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटक येत नाहीत. याची पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज आहे.