शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना मदत

By admin | Updated: January 28, 2015 00:13 IST

पहिल्या टप्प्यातील दुष्काळी निधी वाटप; ९२ कोटीचा निधी वितरित.

बुलडाणा : दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीमधील ११९ कोटी ७४ लाखाचा निधी १0 जोनवारीला जिल्ह्याला प्राप्त झाला होता. गेल्या सतरा दिवसात यापैकी ७६ टक्के निधी शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला असून, त्याचा लाभ १ लाख ९७ हजार ९0२ शेतकर्‍यांना मिळाला आहे.जिल्ह्याला मिळालेला निधी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी तत्काळ त्याच दिवशी तालुकास्तरावर वितरित केला असून, ही मदत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंंत ९२ कोटीचा निधी वितरित झाला आहे. यामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यातील निधी वाटपाची गती संथ आहे. संग्रामपूरला मिळालेल्या ७ कोटी ७४ लाख रकमेपैकी फक्त २ कोटी ८९ लाखाचे वाटप झाले असून, ही टक्केवारी केवळ ३७ टक्के आहे, तर जळगावमध्ये २ कोटी ८४ लाख म्हणजेच ४0 टक्के वाटप झाले आहे. जिल्ह्यात ५ लाख ४८ हजार ६६७ लाख शेतकर्‍यांना या दुष्काळाचा फटका बसला असून, एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये तत्काळ मदत जमा करण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केला असून येत्या ३0 जानेवारीपर्यंत संपूर्ण निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी सांगीतले. *बुलडाणा, मेहकर, चिखली अव्वलदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने घोषित केलेली मदत तत्काळ शेतकर्‍यांपयर्ंत पोहोचविण्यासाठी बुलडाणा,चिखली व मेहकर तहसील कार्यालयांनी तत्परता दाखविली आहे. या कार्यालयांना मिळालेल्या निधी पैकी ९९ टक्के निधी २७ जानेवारीपर्यंंत वितरितही करण्यात आला आहे. ज्या शेतकर्‍यांचे खाते उपलब्ध होते त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात आला असून, या तीनही तालुक्यातील केवळ एक ते दीड टक्केच निधी वाटप होणे बाकी आहे.