९५ हजार शेतकर्‍यांचा मदत निधी रखडला

By Admin | Updated: March 28, 2015 01:50 IST2015-03-28T01:50:06+5:302015-03-28T01:50:06+5:30

दुष्काळ अनुदानाचे ७0 टक्के वाटप; बॅंक खाते नसल्याने निधी वाटपात अडसर.

Help funded 95 thousand farmers | ९५ हजार शेतकर्‍यांचा मदत निधी रखडला

९५ हजार शेतकर्‍यांचा मदत निधी रखडला

बुलडाणा : दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा निधी बुलडाण्याला दोन टप्यात प्राप्त झाला. या निधीचे वाटप तत्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले असले तरी, ९५ हजार ३६८ शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची माहिती नसल्याने जवळपास ३0 टक्के निधीचे वाटप अद्याप झाले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकर्‍यांना दुष्काळाचा फटका बसला. या शेतकर्‍यांना एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी २३९ कोटी ५३ लाखाची मदत प्राप्त झाली आहे. शेवटच्या टप्प्यात निधी वाटपाला गती आली. जास्तीतजास्त शेतकर्‍यांना निधी वाटपाचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. शासनाकडून आलेली मदत संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार बँकाकडे २१२ कोटी ४0 लाखाची रक्कम वळती करण्यात आली. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली.

दोन टप्यात प्राप्त अनुदान : २३९.५३ कोटी रू.

बॅकांकडे पाठविलेला निधी : २१२.४0 कोटी रू.

प्रत्यक्ष खात्यात जमा : १६९.९२ कोटी रू.

एकूण शेतकरी संख्या : ४,७६,८४१

प्रत्यक्षात अनुदानप्राप्त शेतकरी: ३,८१,४७३

 

Web Title: Help funded 95 thousand farmers